दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
महाराष्ट्र राज्यातंर्गत अपघाच्या अनेक घटना दररोज पुढे येत आहेत.अपघातातंर्गत कुणाचा केव्हा मृत्यू होईल हे सांगता येत नाही.जेव्हा अपघातातंर्गत आकस्मिक मृत्यू होतय,तेव्हा अनेकांना मनस्वी दु:ख होतय व त्यांच्या द्वारे हळहळ व्यक्त केली जातय…
एखाद्या कामानिमित्त किंवा भेटीगाठीच्या उद्देशाने मार्गक्रमण करीत असतांना एक मनस्वी अंतर्भाव असतोय.पण,याच मार्गक्रमणात जेव्हा अचानक अपघात होतोय आणि अपघातातंर्गत मृत्यू होतोय,तेव्हा नातेवाईकांच्या अंतःकरणाला खोल जखमा होतात..त्या जखमा मात्र कुठल्याही औषधाने बसत नाही.
“बघाना!,काल नेरी ते शिरपूर मार्गावर रानटी डुकराने चालत्या बाईकला ठोकर मारल्याने पुलगाव (वर्धा) येथील युवराज खडसे यांचा जागीच मृत्यू झाला तर बाईक चालक हे चंद्रपूर जिल्हातंर्गत नागभिड तालुक्यातील मौजा कोजबी येथील रहिवासी असून त्यांचे नाव नरेंद्र कावळे असे असल्याचे कळले आहे,ते सुध्दा गंभीर जखमी झाले आहेत.
मृतक युवराज खडसे यांचा गाव असलेला मौजा पुलगाव कुठे? आणि त्यांचा अपघाताद्वारे मृत्यू कुठे? म्हणूनच म्हणतात वेळ आणि काळ सांगून येत नाही….
अनपेक्षित अपघात हा दिनांक १० आक्टोंबर २०२५ रोज शुक्रवारला श्री.रामचंद्र कामडी राहणार नेरी,यांच्या शेताजवळ झालेला आहे…



