अर्थात ज्या व्यक्तीच्या अनुषंगाने जो ग्रंथ प्रकाशित करायचा असतो ते पुस्तक म्हणजेच गौरव ग्रंथ होय.
अशा ग्रंथात त्या व्यक्तीचे जीवन,चरित्र,व्यक्तित्व,व्यक्तिमत्व,कार्य,कर्तृत्व,श्रेष्ठत्व आणि विचार या गोष्टींचे दर्शन अशा पुस्तकातून घडवायचे असते किंवा घडत असते.अशा ग्रंथात त्या व्यक्तीचे सद्गुण,क्षमता,कौशल्य याचा पण शोध घेतल्या जातो.त्या व्यक्तीच्या जीवनातील चढउतार,यशापयश, ऊंच भरारी,जीवन संघर्ष याचे पण वाचकास दर्शन होते.अशा ग्रंथात ग्रंथसंबंधित व्यक्तीवर अनेक लेख,अनेकांचे मनोगत,मान्यवरांच्या शुभेछा,ग्रंथाची प्रस्तावना,प्रकाशकाचे मनोगत, खुद्द त्यावक्तीच्या भावना व विचार यातून पण वाचकास विचाराचा अवकाश मिळतो.
गौरवग्रंथ म्हणजे ग्रंथाशी संबंधित व्यक्तीचा एक जीवनपटच असतो.त्यात त्याच्या जीवनाचा आलेख असतो.तो वाचकास मार्गदर्शक ठरतो.कारण त्या ग्रंथात फक्त यशाचे शिखर किंवा अधोगतीची दरी नसते तर,दोन्हीचे पण दर्शन घडते.पुढच्यास ठेच मागचा शहाणा ‘ या म्हणी प्रमाणे वाचकास असे ग्रंथ मार्गदर्शक ठरतात.आदर्श असतात.म्हणूनच ते वाचनीय असतात.त्यात अनेक लेखकांचे,लहान मोठ्यांचे त्या व्यक्तीविषयीचे विचार आणि भावना व्यक्त केलेल्या असतात,त्यामुळे सर्वांगाने आणि अनेक दृष्टीकोनाने त्याचे अवलोकन होते.त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू वाचकांच्या तसेच त्या व्यक्तीच्या सुद्धा निदर्शनास येतात.अशी अनेक ग्रंथ वाचनाने जगातील व्यक्ती तितक्या प्रवृती आणि व्यक्ती तितके विचार व दृष्टिकोन ‘ या विविधतेचे दर्शन घडते.
अर्थात माणूस म्हटला की,त्यात गुण आणि अवगुण दोन्ही असतात,त्याचे कडून व्यवहारात काही चुकीच्या आणि काही योग्य पण गोष्टी त्याच्या जीवनात घडत असतात,अर्थात त्याची इच्छा असून किंवा नसून पण असे घडते,किंवा करावे लागते.अर्थात यास कारणीभूत ती व्यक्ती नसते,तर त्याचेवर झालेले संस्कार,सभोवतीचे वातावरण,त्याची परिस्थिती आणि विषमतेची व्यवस्था कारणीभूत असते.म्हणूनच व्यक्तीला man is the bundle of mistakes’ अशी म्हण रूढ झाली आहे. कोणत्याही माणसाकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. यासाठी आपण दुर्योधनाची दृष्टी न अंगीकारता अर्जुनाची दृष्टी अंगीकारली पाहिजे. अशाने पण आपले व्यक्तिमत्व व्यापक आणि श्रेष्ठ बनते. शत्रूला मित्र बनवणे, दया क्षमा शांती सत्य अहिंसा या तत्त्वाचा अंगीकार करणे हे कधीही हितावह असते.
” गौरव ” हा नेहमी सद्गुणांचा करायचा असतो, दुर्गुणाकडे दुर्लक्ष करायच असते.”दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड “या संतांच्या अभंगांचा जो आतून व बाहेरूनही सद्गुनी आणि गोड आहे त्याचा गौरव केलाच पाहिजे, परंतु सद्गुण आणि दुर्गुण आणि युक्त अशी सर्वसामान्य माणसातील त्यांच्यात असलेल्या गुणांना टाळून त्यातील सदगुणांचा गौरव झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसात सद्गुण आणि दुर्गुण या दोन्ही गोष्टी असतात, परंतु दुर्गुणांचा गौरव न करता सद्गुणांचा गौरव होणे हे त्या व्यक्तीसाठी आणि समाजासाठी पण अत्यंत महत्त्वाचे आहे. सत्कार आणि गौरव असे कार्यक्रम समाजाला दिशादर्शक असतात. दुर्गुणी माणसातील सगुण वेचून त्याचा सत्कार करणे म्हणजे त्यास माणुसकीची जाणीव करून देणे होय. अशाने दुर्गुण माणसाला हे कळेल की, सदगुणांचा सत्कार होत असतो दुर्गुणांचा नाही.
वाचकांची वृत्ती आणि लक्ष हे राजहंस पक्षासारखे असले पाहिजे, असे म्हणतात की, राजहंस पक्षापुढे जर पाणी आणि दूध एकत्र मिसळून ठेवले तर तो फक्त त्यातील दूधच आपल्या चोचीने प्राशन करतो. याप्रमाणेच वाचकांनी राजहंस पक्षी बनून व्यक्तीतील दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून फक्त सगुणांचाच स्वीकार केला पाहिजे, त्यांचा गौरव केला पाहिजे. कारण सद्गुण हे गौरवास पात्र असतात. आपण जगात जे पाहतो, ऐकतो, वाचतो, अनुभवतो त्यातील वाईट ते सोडून द्यायचे आणि जे चांगले योग्य सत्य ते स्वीकारायचे असते.
गौरव म्हणजे सत्कार. सत्कार म्हणजे सत्याचा स्वीकार, सत्याचा गौरव. सत्य म्हणजे जे टिकते, ज्याला मरण नाही, अविनाशी आहे, अक्षय आहे ते. म्हणजेच सद्गुण यांचा गौरव. सत्य कार्याचा गौरव म्हणजेच सत्कार. असत्याचा आणि दुर्गुणांच्या गौरव होत नाही आणि काही बेशरम लोकांनीच तो केलाच किंवा करून घेतलाच तर तो जनता स्वीकारणार नाही, कारण असा सत्कार गौरव बेगडी खोटा असतो. हे सर्वांना माहीत असते. असा समारंभ पाहून लोक म्हणतात ” आता मात्र बेशरमीचा कळस झाला “. याचा अर्थ असा सत्कार समाजास अस्वीकार्य असतो, म्हणजेच फजिती घडविणारा असतो, म्हणून सत्याचाच सत्कार म्हणजे गौरव होत असतो, तोच खरा असतो.
माणूस हा गुण आणि अवगुणांचा पुतळा असतो. त्याच्या अंगी असलेले हे गुण अवगुण वेळप्रसंगानुसार व्यवहारात प्रदर्शित होत असतात. अशाप्रसंगी जो माणूस विवेकाचा वापर करतो तो आपल्यातील दुर्गुणांना दाबून ठेवतो, तोंड बाहेर काढू देत नाही, आणि विकी माणूस सदगुणांना स्वातंत्र्य देत नाही तर दुर्गुणांना मोकळे सोडतो म्हणून तो समाजाचा राष्ट्राचा गावचा कुटुंबाचा गुन्हेगार ठरतो. अशा व्यक्ती सत्ता संपत्तीने आणि प्रतिष्ठेने कितीही मोठ्या असल्या तरी बहुसंख्यांकाच्या दृष्टीने तो गुन्हेगार म्हणूनच सिद्ध असतो. अशांचे सत्कार गौरव आणि त्यांचे ग्रंथ हे कचऱ्यासारखे टाकाऊ असतात. त्यांचे स्थान शेवटी कचराकुंडीतच असते.
खरे तर, जनतेने खोट्या सतकारावर बहिष्कारच टाकला पाहिजे, तिथे गर्दी करता कामा नये, तिथे लाचारीने उपस्थिती लावू नये. बोलावले तरी जाऊ नये. पंचपक्वान्न दिले तरी खाऊ नये. अशांचे गौरव ग्रंथ विकतच काय पण फुकट सुद्धा घेऊ नये, या उलट सत्य सत्कारांचा गौरव ग्रंथ फुकट दिले तरी न घेता ते विकतच घेतले पाहिजे. हेच खरे पुण्याचे काम आहे. असे करणे म्हणजे एक प्रकारचे सत्कार्य करणे होय. शेतकऱ्याचा गौरव म्हणजेच गौरव ग्रंथ होय, आणि अशीच गौरव ग्रंथ वाचावीत.
ग्रंथ म्हणजे पुस्तक. पुस्तक वाचल्याशिवाय मस्त घडत नाही आणि असे मस्तक कुणाचे गुलाम बनणार नाही. आपण आर्थिक सामाजिक राजकीय आर्थिक गुलाम आहोत का ? जर असाल, आणि या गुलामीतून मुक्त व्हायचे असेल, सार्वभौम बनायचे असेल, तर त्यासाठी ई बुक असो की हार्ड बुक, ते वाचलेच पाहिजे. पण असेच पुस्तक वाचावे की जे परिवर्तनवादी किंवा आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे असावे. आत्ता आपण जिथे आहोत तिथून परत मागे नेणारे असे पुस्तक नसावे तर “पुढचे पाऊल पुढेच आता मागे वळून बघणे नाही “अशा दृढनिश्चयाचे ते पुस्तक असावे. ते पुस्तक स्थितीवादी साचलेल्या सडलेल्या अडवलेल्या पाण्यासारखे नसावे. तर ते प्रवाही असावे म्हणजे प्रगतिशील परिवर्तनवादी असावे. अर्थातच गौरव ग्रंथ म्हणजे केवळ स्तुती ग्रंथ नसावेत तर ते वाचकास परिवर्तनाची दिशा देणाऱ्या असावेत,, प्रत्येक वाचनालयात जाऊन बसतात. बाकीची मात्र कचरा म्हणून वापरल्या जातात.
शेवटी महत्त्वाचा मुद्दा हा की, गौरव ग्रंथ हे कोणाचे प्रकाशित झाले पाहिजेत ? तर गौरव ग्रंथ हे थोरामोठ्यांचे क्रांतिकारक राष्ट्रपुरुष संत महात्मे महामानव समाजसेवक या परोपकारी माणसांची तर प्रकाशित झालेच पाहिजेत कारण ते माणसात आणि राष्ट्रात परिवर्तन घडवून आणतात, परंतु त्याच बरोबर ज्यांनी कौटुंबिक प्रगती केली, हाल अपेष्टा सोसल्या आणि संघर्ष करून स्वतः शिक्षण घेतले, आपल्या मुला मुलींना शिकवून मोठे केले, असा संसार करीत असतानाच जनसेवा करून परमार्थ पण केला, अशा व्यक्तींचे पण गौरव ग्रंथ प्रकाशित झाले पाहिजेत. कारण छोट्या माणसांच्या छोट्या गोष्टी पण सामान्य माणसांना बरच काही शिकवून जातात. याशिवाय आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक मानसिक सांस्कृतिक वैद्यकीय शैक्षणिक पर्यावरण अशा कितीतरी क्षेत्रात ज्यांनी दैदिप्यमान व महान व संशोधनात्मक कार्य केले आहे, अशांचा पण गौरव ग्रंथ निर्मिले पाहिजेत.
थोडक्यात काय तर, ज्यांनी धर्म अर्थ काम मोक्ष ( बंधन मुक्त) हे चार पुरुषार्थ केलेत त्यांचे गौरव ग्रंथ पण पुढील पिढीस मार्गदर्शक ठरतात.
लेखक : दत्ता तुमवाड.
सत्यशोधक समाज नांदेड.
फोन : 9420912209.



