Home देशविदेश मानसिक गुलामीच्या नशेचा आम्हांला ( भारतीय जनतेला ) मोठा गर्व…….  —...

मानसिक गुलामीच्या नशेचा आम्हांला ( भारतीय जनतेला ) मोठा गर्व…….  — भाग = 2

         गर्वाचे कारण…..

   (1) प्रथम कारण, जगाच्या तुलनेत आमच्या देशात आर्याचे ‘ कू ‘ सांस्कृतिक आक्रमण हजारो वर्षांपासून यशस्वी.

   (2) या धार्मिक, अंधश्रद्धाळू, कर्मकांडी दैवी कल्पनेची मुळे खोलवर रुजल्यामुळे सदविचारी आणि माणूस बनण्याचा ‘ विज्ञानवादाचा मार्ग ‘ आम्हा भारतीयात रुजू शकला नाही.

    (3) या हजारो वर्षाच्या काळात जवळपास 43 प्रकारच्या विविध बाहेरून आलेल्या राजकीय आक्रमण कर्त्यांनी आमची संपत्ती, ( सोने, गुलाम ) लुटून नेली, राज्य केले. परंतू , यात हे सर्व यशस्वी होत गेले. त्याचे मुख्य कारण म्हणजे आर्याचे कुसांस्कृतिक आक्रमणाची मुळे अधिकच मजबूत होत गेली.

  (4) या हजारो वर्षाच्या इतिहासात बोटावर मोजण्या इतक्या महापुरुष, संत, तत्ववेत्त्यांनी या गुलामीतून आम्हांला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतू , ते कमी पडले. त्यांच्या प्रयत्नांना साढे तीन टक्क्या वाल्यांनी आपल्या विविध षडयंत्राद्वारे हे हल्ले परतवून लावले. आणि बहुजनांना आपल्या कूटनितीच्या ( साम, दाम, दंड आणि भेदाच्या ) मायाजाळातून कधीच निसटू दिले नाही.

   (5) इंग्रजांनी आमच्यावर दीडशे वर्षे राज्य केले. परंतू , त्यांनी जेंव्हा लोकशाहीची मूल्ये रुजविण्यासाठीची सुधारणा येथे करण्यास सुरुवात केली आणि धर्मात नाक खूपसले. तेंव्हा 1857 च्या राष्ट्रीय उठावाच्या नावाखाली पुन्हा बहुजनांना एकत्र करून त्यांच्या मदतीनेच इंग्रजांचे हे हल्ले परतवून लावले. मग इंग्रजानी हा नाद सोडून केवळ राज्य करणे हेच धोरण अवलंबिले.

   (6) या संपूर्ण हजारो वर्षाच्या काळात केवळ ” भगवान बुद्धाची धम्मक्रांती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संविधान क्रांती ” या दोनच क्रांत्या या मनुवाद्याच्या जिव्हारी लागल्या…..!

    परंतू , धम्मक्रांतीच्या नंतर अवघ्या 75 वर्षात ” महायान आणि हिनयान ” यांची यशस्वी निर्मिती करून ही क्रांती सुद्धा यशस्वी होऊ दिली नाही. पुन्हा हजारो वर्षे आम्ही यांचे कुसांस्कृतिक गुलाम झालो. त्यानंतर संविधानक्रांतिमुळे या आर्याना, मनुवाद्याना पुन्हा जोराचा झटका मिळाला. परंतू , पुन्हा 75 वर्षातच या संविधान क्रांतीला पेलण्याचे बळ संविधानवाद्यात नसल्याने पुन्हा कुसांस्कृतिक बळाला जोर चढला.

(7) या हजारो वर्षाच्या प्राचीन भारताच्या इतिहासात हे बाहेरून आलेले आर्य लोकं कधीच राजगादीवर बसू शकले नव्हते. परंतू गादीवर कुणीही बसो. रिमोट मात्र आपल्या हातात ठेवत असत.

      परंतू , जेंव्हा संविधान क्रांती यशस्वी झाली. सर्वात संधी यांनाच चालून आली. ती अशी की, आजपर्यंत केवळ राजगादीचा म्हणजे सत्तेचा वासच मिळत होता. आता तर त्या सत्तेतच कुटनीतिद्वारे संधी चालून आली केवळ 75 वर्षातच. म्हणून ही सत्तेची पाळे मुळे पुन्हा घट्ट करण्यात ही मंडळी आता कामाला लागली आहे.

   ( 8) यांनी पहिली गोष्ट ही हेरली की, या बहुजनांना आणि संविधानवाद्याना आर्थिक कंगाल केले की, हे हतबल होतील. मग यांच्यावर मानसिक गुलामी मजबूत करण्यास सोपे होईल. म्हणून त्यांनी 2014 पासून यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली. यामध्ये प्रथम RBI ताब्यात घेणे, देशाची व राज्यांची आर्थिक सर्व बाबी ताब्यात घेऊन सर्व प्रकारचा आर्थिक स्रोत ” RSS च्या RBI मध्ये वळवळा. मग आम्ही लोकशाहीचा विरोधी पक्ष सुद्धा पंगू झाला. परिणामी अजित पवार, एकनाथ शिंदे, नितीश, चंद्रबाबू सारखे देशात असंख्य निर्माण करून RSS ने भाजपच्या हातात एकहाती सत्ता आणली. त्या सत्तेच्या जोरावर देशाच्या तिजोरीची कील्ली हातात घेऊन इतरांना मानसिक गुलामीचा दुसरा गियर टाकण्यास 2025 पासून त्यांनी सुरुवात केली.

   (9) बहुजन स्त्रियांना 1500/- दरमहा देऊन टी. व्ही. मालिकात रात्रंदिवस गुंतविल्यामुळे आणि तीच्या पतीला घर चालविण्यासाठी रात्रदिवस ” कष्ट कर आणि मर म्हणजे कस्टमर ” होऊन तू जगता – जगता मर आणि मरता – मरता जग अशी हतबलता निर्माण केल्याने बहुजन समाज पुन्हा आर्थिक हतबलतेमुळे मानसिक गुलाम झाला आणि धार्मिक कर्मकांडात गुंतविण्यात हे यशस्वी झाले.

  (10) युवापिढीला सुद्धा मोबाईल, इंटरनेट आणि मद्यपान यातच ( दवाखाना म्हणजे आरोग्य आणि शाळा म्हणजे संस्कार कमी करून, मंदिरे, विहारे उभारण्यात निधी कमी पडू न दिल्यामुळे ) गुंतवल्यामुळे उद्याच्या भावी भारताचा पाया मनुवाद्यांनी मनुस्मृती कडे घेऊन जाण्याचा पहिला गीयर टाकला.

        म्हणूनच संविधानाचा प्रथम कॉलम असलेल्या न्यायमंडळावर बूट फेकण्याची मानसिकता यांनी तयार केली. ती अमलात आणली सुद्धा……!

    आता यावर उपाय काय….?

        आता बहुजनांनी कोणत्याही महापुरुषांच्या, मंदिराच्या, मुर्त्यांच्या आमच्याकडूनच करवून घेतलेल्या विटंबनेविरोधात लगेच रीऍक्ट होऊन आपली मुले पोलिसात गुन्हे नोंदवून घेऊन मुलांचे शैक्षणिक जीवन बरबाद करवून घेऊ नका.

          बहुजनांनी आपले आदर्श असलेले संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यातील विज्ञानवाद आचरणातून सिद्ध करा. आदरणीय मा. म. देशमुख सर, सत्यपाल महाराज, बिदागी न घेता कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांचे संस्कार लक्षात घ्या. अर्थात कर्मकांड, सत्यनारायनातून बाहेर पडा. खऱ्या विज्ञानवादी शिक्षणाची कास धरा.

          आता बौद्ध समाजाने सुद्धा पाच शीलाचे तंतोतंत पालन करून अहंकाराला कायमचे मातीत गाडून खऱ्या त्यागी चिवरातल्या व्यक्तीला ओळखून त्यांच्याशी जशास तसे व्यवहार करून RSS वादी चिवरातल्या पिलावळीला ओळखा.

   संविधानवाद्यानी आता जबाबदार एकनिष्ठ नागरिक होऊन कृतीतून सिद्ध होण्याचा प्रयत्न करावा….

   तरच हे मनुवाद्याचे शेवटचे कुसांस्कृतिक आक्रमण आपण परवून लावू शकू……

  अन्यथा………!

   जागृतीचा कृतिशील लेखक 

            अनंत केरबाजी भवरे 

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689