Home Political चिमुर न.प.चे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर..  — अध्यक्षपद अनु जातीच्या महिलांसाठी...

चिमुर न.प.चे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर..  — अध्यक्षपद अनु जातीच्या महिलांसाठी राखीव…

    रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

            नगर परिषद चिमुर सार्वत्रिक निवडणूक – २०२५ निवडणुकीकरीता काल मंगळवार ला निवडणूक निर्णय पिठाशीन अधिकारी डाॅ‌संतोष थिटे यांचे अध्यक्षतेखाली व न.प. मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांचे उपस्थितीत १० प़भागातील प़त्येकी २ नगर सेवकाकरिता प़भाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.

        १० प्रभागातील प़त्येकी २ नगर सेवकाकरिता एकुण २० नगर सेवकाकरिता पुढील प़माणे आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग १ अ) अनुसुचित जातीं, ब) सर्वसाधारण प़वर्ग महिला, प़भाग,२ अ) अनुसुचित जमाती, ब) नागरिकांचा मागास प़वर्ग, प्रभाग ३ अ) नागरिकांचा मागास प़वर्ग महिला, ब) सर्वसाधारण प्रवर्ग, ४ अ) अनुसुचित जातीं महिला, ब) सर्वसाधारण प़वर्ग, ५ अ) अनुसुचित जमाती , ब) सर्वसाधारण महिला, ६ अ) अनुसुचित जमाती महिला, ब) सर्वसाधारण प्रवर्ग, ७ अ) अनुसुचित जमाती महिला, ब) सर्वसाधारण प्रवर्ग, ८ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण महिला, ९ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण महिला, १० अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण प्रवर्ग.

       अशाप्रकारे प़भाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते व निवडणुकरिता इच्छुक असलेले असंख्य नागरिक उपस्थित होते.