Home Maharashtra निराधार अनुदान योजने अंतर्गत चिमूर तालुक्यातील प्रलंबित देयके बाबत संपूर्ण माहिती लेखी...

निराधार अनुदान योजने अंतर्गत चिमूर तालुक्यातील प्रलंबित देयके बाबत संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात देण्यासाठी उपसरपंच अशोक चौधरी यांनी दिले तहसीलदार चिमूर यांना पत्र… — याचबरोबर थकीत लाभार्थ्यांना त्वरित अनुदान वितरीत करण्याची केली मागणी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी..

       राज्य शासनाच्या निराधार अनुदान योजने अंतर्गत चिमूर तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे अनुदान हप्ते मागील काही महिन्यांपासून थकित आहेत. शासनाकडून या योजनेच्या माध्यमातून गरजू, निराधार व आर्थिकदृष्ट्या द्बल घटकांना नियमित आर्थिक सहाय्य दिले जाते. 

      तथापि,अनेक लाभार्थ्यांचे पेमेंट दीर्घकाळ प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

    त्यामुळे खालील माहिती लेखी स्वरूपात ७ दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी नम्र विनंती आहे.

१. चिमूर तालुक्यातील निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची एकूण संख्या.

२. सन २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीतील प्रलंबित हप्त्यांची एकूण आकडेवारी.

३. किती लाभार्थ्यांचे किती महिन्यांचे हप्ते थकित आहेत,याची नावे व तपशीलवार यादी.

४. शासनाकडून निधी प्राप्त होण्याची सद्यस्थिती व लाभार्थ्यांपर्यंत तो निधी पोहोचविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर करण्यात आलेली कार्यवाही.

     ५. सदर थकीत अनुदान नेमक्या कोणत्या कारणामुळे रोखले गेले आहेत, याची स्पष्ट माहिती.

        ही माहिती अधिकृत शिक्क्यासह लेखी स्वरूपात द्यावी.

        तसेच,सदर प्रकरणात तत्काळ कार्यवाही करून प्रलंबित अनुदान लाभार्थ्यांना वितरीत करण्यात यावे,ही आग्रहाची मागणी करण्यात येत आहे.अन्यथा,लाभार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल,याची कृपया नोंद घ्यावी अशा इशारा उपसरपंच अशोक चौधरी यांनी दिली आहे.

           त्यांनी सदर निवेदनाच्या प्रती श्री. अशोक उईके पालकमंत्री, चंद्रपुर जिल्हा,जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना पाठविण्यात आल्या आहेत.