Home Social सम्यक बुद्ध विहार देलनवाडी येथे धम्म प्रवर्तन सप्ताह सोहळ्याचे आयोजन…

सम्यक बुद्ध विहार देलनवाडी येथे धम्म प्रवर्तन सप्ताह सोहळ्याचे आयोजन…

अनिलकुमार एन.ठवरे

       जिल्हा प्रतिनिधी

         दखल न्युज भारत 

देलनवाडी :- युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ साली धम्म दिक्षा घेतली व आपल्या लाखो अनुयायांना धम्म दिक्षा दिली.या ६९ व्या धम्म प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सम्यक बुद्ध विहार देलनवाडी येथे दिनांक ०७/१०/२०२५ ते १४/१०/२०२५ असे सात दिवसीय धम्म प्रवर्तन सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

           या प्रसंगी सम्यक बौद्ध समाज अध्यक्ष आयु. अनिलकुमार ठवरे, सचिव आयु. सचिन सहारे,सदस्य आयु. टिकाराम तागडे,महिला अध्यक्षा आयु. रेखाताई टेंभुर्णे, सचिव आयु.वैशालीताई भैसारे, कोषाध्यक्षा आयु. सारिकाताई साखरे यांच्या हस्ते भीम ज्योत प्रज्वलित करून सप्ताह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास बहुसंख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते.