Home Social परमात्मा एक सेवकांची कोजागिरी उत्सवात ‘एका भगवंताच्या’ विचारधारेवर चर्चासत्र; गुणवंत विद्यार्थी आणि...

परमात्मा एक सेवकांची कोजागिरी उत्सवात ‘एका भगवंताच्या’ विचारधारेवर चर्चासत्र; गुणवंत विद्यार्थी आणि सेवकांचा गौरव…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : येथील चर्चासत्र स्थळ येथे परमात्मा एक सेवकांची कोजागिरी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीवर आधारित ‘एका भगवंताची ‘ (परमात्मा एक) या विचारांवर चर्चा बैठक आयोजित करण्यात आली होती.

        कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर, परमपूज्य महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

            कोजागिरीचे औचित्य साधून ‘एका भगवंताची’चर्चा बैठक आयोजित करण्यात आली, ज्यात सेवकांनी बाबांच्या विचारधारेवर आणि ‘परमात्मा एक’ या तत्त्वज्ञानावर मानव धर्माच्या शिकवणीवर आपले विचार व्यक्त केले.

        या कोजागिरी समारंभासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि परिसरातील मार्गदर्शक उपस्थित होते. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष देवरामजी तुमसरे साहेब, साकोली शेंदुरवाफा परिसरातील मार्गदर्शक रामलालजी रुखमोडे, ज्येष्ठ सेवक माणिकरामजी निखारे सर, डॉ.अजय तुमसरे, चर्चासत्र स्थळ चे अध्यक्ष सुरेशजी वलथरे साहेब, सचिव बाबुरावजी मेश्राम साहेब, तसेच आनंदजी सोनवणे, शेषरावजी भानारकर, दिगंबरजी दिघोरे, राजकुमार कांबळे, वासुदेवजी वाडीवस्मे, उत्तमजी वाडीभस्मे, धनंजय तुमसरे, सेवकरामजी बावनकर, श्रीरामजी निंबेकर, रामदासजी मस्के, मेश्राम सर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पूजनासह सर्व कार्यक्रम पार पडले.

             कोजागिरी उत्सवाच्या औचित्याने सामाजिक जाणीव म्हणून गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह ( ट्रॉफी )व पदक देऊन गौरविण्यात आले.

        त्याचप्रमाणे, सेवकांच्या मुलांमधून शासकीय नोकरीत निवड झालेल्या यशस्वी युवकांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराने तरुण पिढीला समाज आणि देशाच्या सेवेत जाण्यासाठी प्रेरणा मिळाली.

         चर्चा बैठक आणि सत्कार सोहळ्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. स्थानिक व परिसरातील सेवकांनी सादर केलेल्या कला प्रकारांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली.

         परमात्मा एक सेवकांनी आयोजित केलेला हा कोजागिरी उत्सव, आध्यात्मिक चर्चा, गुणवंतांचा गौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यामुळे साकोली परिसरात मानव धर्माची शिकवण व परिसरातील सेवकांची एकता यामुळे मोठ्या संख्येने सेवक बंधू भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या आनंद द्विगुणित केला. त्याचबरोबर सर्व सेवकांनी भोजनाचा आस्वाद घेऊन अमृततुल्य दूध प्राशन करून कार्यक्रमाचे सांगता भगवंताच्या जयघोषाने करण्यात आले.

          सदर कार्यक्रमाकरिता सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ, चर्चासत्र स्थळ चे सर्व पदाधिकारी नवयुवक तरुणांनी विशेष करून उज्वल पडोळे,तेजराम वलथरे, राहुल निंबेकर, शिवचरण वलथरे अभिमन बोरकर यांनी अथक परिश्रम घेतला.