Home देशविदेश संघर्ष, क्रांती, परिवर्तन…

संघर्ष, क्रांती, परिवर्तन…

        हे तीन शब्द किंवा संकल्पना एकच आहेत,किंवा सारख्याच. असे वरकरणी वाटतात.पण तसे नाही,या तिन्ही गोष्टींचा अर्थ वेगळा आणि अवस्थाही वेगवेगळी आहे,यासाठी बारकाईने पाहिले पाहिजे.

      संघर्ष म्हणजे टकराव, भांडण,मतभेद,चळवळ,वळवळ. संघर्षासाठी दोनचा आकडा असतो,मग दोन गोष्टी,दोनविचार,दोन संकल्पना,दोन व्यक्ती,दोन समूह जाती,दोन धर्म,दोन वंश,दोन प्रांत भाषा राष्ट्र.याचा अर्थ जिथे एक आहे,तिथे संघर्ष नसतो,जिथे दोन आणि अनेक असतात तिथे संघर्ष असतो,किंवा नसला तरी उद्भवतो.तसेच एक ऐवजी दोन किंवा अनेक असूनही ते एक असतील,म्हणजे त्यांच्यात एकी असेल तर तिथे भांडण ,मतभेद,संघर्ष नसतो.किमान समान पातळीवर एक असतात.पण अनेकतेत एकता शोधली,मनाली अवलंबली तर.तरच हे शक्य आहे,यासाठी मतभेद होने पर भी मनभेद हो ना पाये ” हे तुकडोजी महाराजांचा उपदेश अंगिकारावे लागते,तर एक पेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा अनेक व्यक्ती,समूह,धर्म,संस्कृती असले तरी त्यांच्यात संघर्ष होऊ शकत नाही,पण यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद हवा.आणि हे तेंव्हाच शक्य आहे,जिथे सर्वधर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था आहे.जिथे समता आहे,तिथे हे शक्य आहे,पण जिथे विषमता आहे,तिथे द्वैतभाव,आणि द्वेषभाव,उच्चनीचता भाव असतो,म्हणून संघर्ष घडतो.याचा अर्थ परिस्थितीतूनच संघर्ष निर्माण होतो.

       क्रांती म्हणजे उठाव, बंड, भूकंप,लाव्हारस.संघर्ष जेंव्हा सीमा ओलांडतो तेव्हा त्यातून क्रांती होते.क्रांती म्हणजे अचानक उसळलेला समुद्र नव्हे,तर संघर्ष हा पेटत पेटत वाढत वाढत वाढतो,त्याची ज्वाला होते,म्हणजे क्रांती होते.आधी संघर्षाची ठिणगी पडते,मग ती कधी विजते तर कधी न विजत वाढतच जाते.ठिणगीची मशाल बनते,मासळीचा मग आगडोंब , वणवा पेटतो.यास क्रांती म्हणतात.क्रांतीलाही कारण असते,विनाकारण क्रांती किंवा संघर्ष होत नसतो.संघर्षाने पेट घेतला की,मग क्रांती होते. धुपून धुपून मग ती पेट घेते.कधी ती उत्स्फूर्त असते,तर कधी ती ठरवून केली जाते.जी क्रांती रचनात्मक क्रांती असते,तेंव्हा परिवर्तन होते.उत्स्फूर्त क्रांतीतून परिवर्तन म्हणजे बदल होत नाही.क्रांतीनंतरही पूर्वीचीच व्यवस्था आणि अवस्था ( परिस्थिती ) असते.मग अशा क्रांतीचा काय उपयोग ? यातून हकनाक मालमत्तेची आणि जीविताची हानी भयंकर होते.एव्हडी हानी होऊनही हाती काहीच लागत नाही,उद्देश पण प्राप्त होत नाही.शेवटी येरे माझ्या मागल्या ताक कण्याच चांगल्या,अशी मानसिकता जनतेची होते,यामुळे अशी पिढी तरी संघर्ष क्रांती करू शकत नाही.कारण क्रांतीवरचा यांचा विश्वास उडतो.याउलट जर उद्दिष्ट स्पष्ट आणि व्यवस्थेची कल्पना स्पष्ट असली तर रचनात्मक क्रांती यशस्वी होऊ शकते.अशी काही उदाहरणे म्हणजे अनुभव आहेत.आणि हे अशक्य नाही,हे अशा क्रांतिनीं दाखवून दिले आहे.

        परिवर्तन म्हणजे बदल.बदल म्हणजे परिस्थितीत बदल.माणसांच्या मानसिकतेत आणि अवस्थेत ( भौतिक आणि मानसिक ) बदल.व्यवस्था बदल होय.याचा अर्थ विषमतेतून संघर्ष,संघर्षातून क्रांती,क्रांतीतून परिवर्तन अशा तीन अवस्था आणि पायऱ्या आहेत.

       पुढील उदाहरणावरून संघर्ष,क्रांती,बदल ही प्रक्रिया समजून घेता येईल.

      एका पातेल्यात पाणी घेतले,ते पातेले चुलीवर किंवा गॅस शेगडीवर ठेवले.गॅस चूल पेटवली की,पाण्यातील हवामान बदलते.हवामान म्हणजे पाण्याचे उष्णतामान.समजा ते गोठलेले असेल तर त्याचा बर्फ होईल,नसेल तर ते सम शितोषण असेल.अधिकच गरम पण होईल.याचा अर्थ बाहेरील हवेतील उष्णतामान जसे असेल तसे त्याचे उष्णतामान असेल,म्हणजे थंड,मध्यम,गरम वगैरे.

     आता चुलीवर ठेवलेल्या पातेल्यातील पाण्याला जशी जशी उष्णता अधिक अधिक वाढेल तसे तसे पाण्याची अवस्था बदलत जाईल,म्हणजे एकांश सेंटी ग्रेड हून दोनवर,दूरवरून तीनवर,त्यावरून चारवर असे क्रमाने वाढत वाढत जाऊन जेंव्हा ते 100 अंश सेंटिग्र्ड वर येईल,तेंव्हा त्याची वाफ होईल,याचा अर्थ पाणी राहणार नाही.म्हणजेच पाण्याचे रूपांतर वाफेत होईल.आता पाण्याला आपण पाणी न म्हणता वाफ म्हणू.

   याच प्रमाणे पाण्याला जर एक वरून 100 वर फ्रीज केले म्हणजे थंड केले,तरीही त्याची अवस्था बदलून ते बर्फ होईल.याचा अर्थ या प्रक्रियेस क्रमिकतेची प्रक्रिया असे म्हणू या.एक बदलून दोन होणे,दोन बदलून तीन सेंटिग्रेड होणे,असे क्रमाने क्रमाने 100 च आकडा गाठला की,अवस्था बदलते,आणि मग उद्दिष्टानुसार, धोरण आखून नवी व्यवस्था निर्माण होते.यास परिवर्तन म्हणतात.एक अंक बदलून दोन होणे,हे सुद्धा परिवर्तनाचं होय.परिवर्तन म्हणजे बदल.या बदलात आधी संघर्षाची क्रमिकता बदलते,त्यामुळे क्रांती होते,क्रांतीची क्रमिकता बदलते म्हणून परिवर्तन घडते,दिसते.

     अर्थात रचनात्मक संघर्ष,क्रांती ही अहिंसक आणि संविधानिक असते,तर उत्स्फूर्त किंवा रचना उद्देश धोरण नसलेली क्रांती ही असंवैधानिक आणि हिंसक असते.अर्थात क्रांती ही हिंसेच्या मार्ग की अहिंसेच्या मार्गाने होऊ शकते,हा ज्याचा त्याचा विचाराचा,इतिहासाचा,अनुभवाचा ,मान्यता च विषय आहे.तो अभ्यासपूर्ण अवस्थेत ठरवायचा असतो.मात्र एवढे खरे की,तुम्ही कोणत्याही मार्गाने क्रांती करा,पण संघर्ष त्यानंतर क्रांती केल्या शिवाय परिवर्तन होणे शक्य नसते.त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करावी लागते,म्हणजेच आधी विचार बदला,मानसिकता बदला तरच परिवर्तन होईल.अन्यथा आपली परिस्थिती,अवस्था बदलणार नाही.

      लेखक : दत्ता तुमवाड.

        सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक : 30 एप्रिल 2025.फोन: 9420912209.

टिप :- हा लेख सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना उपयोगी ठरेल,अशी माझी समजूत आहे.कदाचित कुणाच्या दृष्टीने चूकही असू शकते..