शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
राज्यात अनु:जातीत उपवर्गिकरण करण्यासाठी सरकाने षडयंत्र सुरू आहे.पंरतु अनु:जाती मध्ये उपवर्गिकरण झाले तर सामाजिक सलोखा मध्ये वातावरण दुषित होणार,तसेच भारताच्या संविधानातील कलम ३४१ नुसार अनु:जाती या समाजघटकाला ऐतिहासिक अन्याय,सामाजिक भेदभाव,आणि आर्थिक पिछाडीस सामोरे जावे या करीता अनु:जाती ला आरक्षण संविधानाने कायदेशीर तरतूद केली आहे.
पंरतु आजही जातीवरुन हत्याकांड होत आहे,जातीवरुन घोड्यावर बसलेला नवरदेवाला मारहाण केली जाते,मिश्या ठेवल्या म्हणुन मारहाण केली जाते.
पंरतु अनु:जातीतील घटकांना समान संधी सामाजिक न्याय आणि उन्नती मिळावी या उद्देशाने अनुसूचित जातींना आरक्षण व इतर संवैधानिक हक्क प्रदान करण्यात आले.
मात्र अलिकडच्या काळात अनु: जातींमध्ये उपवर्गिकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे.अश्या वर्गिकरणामुळे मुळ उद्देशास बाधा येऊन समाजात नविन तणाव व भेदभाव असमानता होऊ शकते.
महत्त्वाचे म्हणजे सन २०११ पासुन भारतात जनगणना नाही व लोकसंख्या आकडा नाही नेमका कोणता समुदाय किती हेही अधिकृत नाही आणि नविन जनगणनेला सुरुवात सुध्दा झाली नाही.

अश्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातीतील प्रत्येक जातीचे अद्यावत लोकसंख्या प्रमाण आणि त्यानुसार आजचे प्रतिनिधित्व याबाबत अधिकृत विश्वसनीय माहीती उपलब्ध नाही.
अश्या परिस्थितीत अनु:जाती चे उपवर्गिकरण करण्याचा प्रयत्न अपुर्ण व चुकीच्या आकेडेवारीवर आधारित ठरेल व सुप्रिम कोर्टाचा निर्णय ऐच्छिक -सर्वोच्च न्यायालयाने अनु:जाती मध्ये उपवर्गिकरण करण्याबाबत राज्यांना परवानगी जरी दिली असली तरी ते बंधनकारक नाही हा निर्णय केवळ राज्यांना ऐच्छिक अधिकार आहे.
त्यामुळे राज्य सरकारने अनु:जातीवर अन्याय करुन नवा डाव किंवा सामाजिक सलोखा निर्माण होणार अश्या कोणत्याही बाबी करु नये..
प्रमुख मागण्या…
१) केंद्र सरकारने व राज्य सरकारने अनु:जाती मध्ये उपवर्गिकरण करणे तात्काळ थांबवावे…
२) अद्यावत व जातीय जनगणना पुर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची निर्णय देऊ नये किंवा घेऊ नये…
जर सरकारने याला प्रतिबंध करण्यासाठी त्वरीत पावले उचलली नाहीतर आमचे नेते भिम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक प्रफुल्ल भाऊ शेंडे व आमचे नेते आंनदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष हे राज्यभर आंदोलन करतील.
तसेच या आंदोलनाला उग्र रुप चिमुर तालुक्यात प्रत्येक गावत दिसल्या जाणार.यासाठी भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका संघटना व रिपब्लिकन सेना पक्ष चिमुर च्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी चिमुर व तहसीलदार चिमुर यांना आज निवेदन सादर केले.
यावेळी उपस्थित भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका संघटना कार्याध्यक्ष जगदीश मेश्राम,तालुका अध्यक्ष आषिश बोरकर उपस्थित कार्यकर्ते विशाल लोखंडे,एकनाथ लोखंडे,वैभव नन्नावरे आदी उपस्थित होते.



