निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : जिल्हा परीषद हायस्कूल साकोली येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा संत विदेही मोतीराम बाबा आश्रम सावरबंध येथील संत गुरूमाऊली ह.भ.प. वसंतबाबा बेंदवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांचे नुकतेच शहरातील चंद्रकांत ज्वैलर्सच्या उद्घाटनप्रसंगी आगमन झाले होते.
जिल्हा परिषद हायस्कूल येथील उत्तुंग भरारी घेतलेला रिद्धेश साठवणे याचा सुवर्ण पदक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्राविण्य प्राप्त सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ नुकताच थाटात पार पडला. विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक हे चंद्रकांत ज्वैलर्सचे संचालक चंद्रकांत वडीचार यांकडून आयोजित केले होते. कार्यक्रमाला संत सदगुरू हभप वसंतबाबा बेंदवार, मध्यवर्ती बँकेचे संचालक होमराज कापगते, वैनगंगा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, जिपस मदन रामटेके, शाळा समिती अध्यक्ष अशोक कापगते, विदर्भ निधी अर्बन बँक अध्यक्ष प्रवीण भांडारकर, रवि अग्रवाल, राजु पालिवाल, उपसरपंच अनिल शेडे, प्रभाकर सपाटे, मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे, पुष्पा कापगते, मूरलीधर गजापूरे, इंद्रायणी कापगते, राहूल राऊत, सुभाष बागडे, रेवतराम भेंडारकर, सरपंच नंदू कावळे, लालचंद लोथे, सरपंच पुष्पा पटले, सरपंच कुंदा मुंगमोडे, नरेश राऊत, अश्विन नशिने, सविता ब्राम्हणकर, प्रेम गहाणे, आशा शेडे, राशिद कूरेशी, डी. जी. रंगारी, पोलीस पाटील बाबाराव रहांगडाले व अन्य मान्यवर उपस्थित होते. येथे नविन चंद्रकांत ज्वैलर्सचे शुभारंभ प्रसंगी नगरपरिषदेतील स्वच्छतेचे खरे हिरो सफाई कामगारांचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सर्व जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक, शाळा समितीचे पदाधिकारी व सदस्यगण आणि पालक जनता उपस्थित होती. दरम्यान संचालन शिक्षक बी. आर. चव्हाण यांनी केले तर आभार चंद्रकांत वडीचार यांनी मानले.



