अतिवृष्टी म्हणजे ओला दुष्काळ, कमी वृष्टी म्हणजे कमी पावसाळा म्हणजेच किंवा पावसाळा न होणे म्हणजेच कोरडा दुष्काळ, धरनी कंप,भूकंप, अती उष्णतामान म्हणजे उन्हाळ्याच्या झळा,वादळ,चक्रीवादळ, अती थंडी,हवामान बदलणे,म्हणजे अती तरी होणे किंवा कमी तरी होणे,थोडक्यात अतिकमी किंवा अतिजास्त अशा घटना घडणे म्हणजेच निसर्ग आपत्ती,म्हणजेच अती तेथे माती.निसर्गाचा समतोल बिघडणे म्हणजेच नैसर्गिक आपत्ती होय.
निसर्ग म्हणजे जैविक घटक( सजीव सृष्टी ) म्हणजे कीटक,पशु,पक्षी,मानव.आणि आ जैविक ( जडसृष्टी ) म्हणजे हवा पाणी अग्नी आकाश पृथ्वी ही पंचमहाभूते.जड सृष्टी व सजीव सृष्टी मिळून निसर्ग बनलेला आहे.किंवा या सृष्टीलाच निसर्ग असे म्हणतात.
आता आपण पर्यावरण आणि ते बिघडणे म्हणजे काय ? हे पाहू.
पर्यावरण याचा अर्थ सभोवतीचे वातावरण.वातावरण बदलणे आणि हवामान बदलणे याचा अर्थ निसर्गाचा समतोल बिघडणे.म्हणजेच निसर्गाचे जे निर्जीव घटक ( जड सृष्टी ) हवा पाणी जमीन अवकाश अग्नी जल हे दूषित होणे.हे घटक दूषित होणे किंवा बिघडल्यामुळे पर्यावरण म्हणजे वातावरण बिघडते.हवा दूषित झाली,पाणी दूषित झाले,जमीन दूषित झाली की,वातावरण बिघडते.आणि हे प्रदूषण करण्याचे काम आपणच करतो,समजून किंवा नकळतही.किंवा निष्काळजीपणा मुळे.रासायनिक खते औषधी बियाणे वापरून माती दूषित केली, म्हणजे शुद्ध होती तीला अशुद्ध केले,कोळसा अर्भक लोखंड सोने,तांबे , गी टी मिळवण्यासाठी, डोंगर कोरले, खदा नी केल्या,शेतीला पाणीसाठी 400 फुटापर्यंत जमिनीला लाखो छिद्र पाडले. डिझेल आणि पेट्रोल साठी जमिनीत आणि समुद्रात विहिरी काढल्या, विहिरीत नदीत तळ्यात गणपती दुर्गा टाकल्या त्यांची निर्मल्य टाकली तसेच सर्व मलमूत्र नदीत सोडले, सर्व कचरा पण नदी नाल्यात टाकला. वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेलचा वापर करून सर्व कार्बन डाय-ऑक्साइड हवेत सोडला आणि हवा दूषित केली, डीजे लावले, वाहनांचे कर्कश आवाज केले, भरमसाठ वृक्षतोड केली, यामुळे हवेतील ऑक्सिजन कमी झाले आणि कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण वाढले, अशाप्रकारे हवेचे प्रदूषण, मातीचे प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण करून आपण माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी पैसा संपत्ती जमा करण्यासाठी आणि श्रीमंत होण्याच्या लोभापाई आपण निसर्गाचे शोषण केले. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला, त्याचा परिणाम म्हणून भूकंप ज्वालामुखी अतिवृष्टी कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ उष्णतामान इत्यादी संकटे आपणच आपल्या भोवती निर्माण केलेली आहेत.
अर्थात निसर्गाचा समतोल बिघडणे अत्यंत मोठी समस्या असून ही समस्या केवळ एका देशाची नाही तर जगातील संपूर्ण राष्ट्राचे आहे म्हणजेच जागतिक उष्णतामान, जागतिक थंडी, भूकंप हे साऱ्या जगातच घडत असतात, म्हणून निसर्गाचा असमतोलपणा आणि पर्यावरण याचा असमतोलपणा ही एक मोठी समस्या बनलेली असून या समस्या वर उपाय काढण्याचा प्रयत्न जागतिक संघटना युनो येथे होत आहे, या समस्यावर विचार होत आहे, आणि काही उपाय करण्याचे पण सर्व देशांनी ठरवलेले आहे, तरी परंतु जोपर्यंत भांडवलशाहीचे धोरण सरकार राबविणार आहे तोपर्यंत असमतोलपणाचा हा प्रश्न सुटणार नाही हेही तेवढेच खरे आहे.
यावर उपाय म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था संपवून समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण होण्याची खरी गरज आहे, त्याशिवाय अतिवृष्टी अति उष्णतामान भूकंप अति थंडी यासारखे परिणाम जगाला जगातील प्रत्येक माणसाला भोगतच राहावे लागणार आहे.
डिझेल पेट्रोलचा वापर बंद करणे आणि जैविक इंधन किंवा सौर ऊर्जेचा वापर करणे हा एक हवा प्रदूषण मुक्त करण्याचा चांगला मार्ग आहे, जनतेने अंधश्रद्धा सोडून गणपती आणि दुर्गाच्या मुर्त्या आणि पूजेचे सर्व सामान समुद्रात किंवा नदीत किंवा धरणात किंवा तलावात न टाकता नगरपालिकेने किंवा ग्रामपंचायतीने बांधून दिलेल्या हौदामध्येच टाकले पाहिजे, सेंद्रिय पदार्थापासून बनवलेल्या मुर्त्यांचाच वापर केला पाहिजे, खत औषधीने बियाणे ही सेंद्रियच पाहिजेत, पारंपारिक खते औषधी बियाणे निर्माण केली पाहिजेत, पाळीव प्राण्यांच्या शेणापासून कचऱ्यापासून खते बनविली पाहिजेत आणि तिचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, पारंपारिक बियाणांचा वापर केला पाहिजे, संकरित बियाणे यांचा वापर करणे बंद झाले पाहिजे, रासायनिक खतांची कारखाने बंद करायला पाहिजेत, वृक्षतोड थांबविली पाहिजे आणि वृक्ष लागवड केली पाहिजे त्यांचे संरक्षण आणि जोपासना पण केली पाहिजे, प्रत्येक गावात नगरात देशात जगात सगळीकडेच 30% जंगल पाहिजे असे पर्यावरण तज्ञ म्हणतात. 30 टक्के वृक्ष म्हणजे एकूण जमिनीच्या 30% जमिनीवर वृक्षाची लागवड होणे अत्यंत गरजेचे आहे, कारण वृक्ष हे प्राणवायू देतात, रक्षक जर नष्ट झाली तर कृत्रिम ऑक्सिजन निर्माण करून त्याच्या पिशव्या बनवून त्यांना लावून फिरणे हे फारच खर्चिक होणार आहे. पाणी दूषित झाल्यामुळे त्याला फिल्टर करून त्याची शुद्धीकरण करून त्यात काय औषधे घालून आज एक लिटर पाण्याची बॉटल वीस रुपयाला विकत घेत आहोत असेच ऑक्सिजनचे पण होणार आहे, म्हणजे ऑक्सिजन पण विकत घेण्याची वेळ येणार आहे, जर वृक्षतोड नाही थांबवली किंवा वृक्ष लागवड नाही केली तर हे दिवस नक्कीच येणार आहेत.
स्वार्थी माणसांनी निसर्गाचे शोषण केले आणि आर्थिक सामाजिक विषमता निर्माण केली, पर्यावरण बिघडून टाकले, स्वतः श्रीमंत झाले, आयुष्य जीवन भोगत आहेत, पण अशी माणसे मृत्यूला पण जवळ करीत आहेत, हे यांना कधी कळणार आहे ? हाच तर खरा प्रश्न आहे.
अतिवृष्टी ओला दुष्काळ आदेश काळ भूकंप हवा प्रदूषण यामुळे माणसं मरणारच आहेत, अशावेळी सरकार सुद्धा मदत करायला कमी पडते, समाजही मदत करायला कमी पडतो, याचा अर्थ निसर्गाचा खूप झाला तर त्यावर कोणीही काहीही उपाय करू शकत नाहीत, हेच सत्य आहे, आणि जे काही उपाय करतील ते कमीच पडणार आहेत.
अशावेळी जेव्हा वित्तहानी होते, मालमत्तेची हानी होते, जीवित हानी होते, माणसे आणि जनावरे मरतात, अशावेळी एक राज्य ेक्टरी 50 हजार रुपये देते तर दुसरे राज्य आठ हजार रुपये देते, असे का? यावर पण मतदारांनी विचार केला पाहिजे ,? आणि जे सरकार जनतेने निवडून दिलेले आहे आणि जनतेच्या तिजोरीतून जनतेला पैसे देण्यासाठी हात आखडता घेते असे सरकार मतदारांनी उलथून पाडले पाहिजे, परंतु आई निवडणुकीच्या वेळी आंधळ्याला लागली खाज या गोष्टीप्रमाणे भोळे भाबडे लोक आणि गरजू लोक गरीब लोक दारू पैसा मटन याला भुलतात आणि असे प्रसंग विसरून जातात, परत त्याचा आमदारांना आणि खासदारांना निवडून देतात, म्हणूनच ते फसतात, आणि असे भोग भोगत असतात, आपल्याच कर्माची ही फळे आहेत, हे जोपर्यंत आपणास कळणार नाही, तोपर्यंत असेच रडत बसावे लागणार आहे, अशीच संकटे येत राहणार आहेत. आपण कधी शहाणे होणार ? हा तर खरा प्रश्न आहे.


