ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली – वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय यश संपादन करून महाविद्यालयाचा परचम फडकावला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या वतीने आयोजित शारीरिक शिक्षण पारंगत एम.पी.एड.ग्रीष्मकालीन परीक्षा २०२५ मध्ये रितू पुत्री श्री. रमेश कुमार हिने प्रथम क्रमांक, आरती पांडे पुत्री श्री. कृष्णदेव पांडे हिने तृतीय क्रमांक, तर धनश्री अशोक पडोळे हिने आठवा क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा मान वाढविला आहे.
तसेच बी.पी.एड. अभ्यासक्रमातील विद्यार्थी दिलखुश मीनाने याने विद्यापीठात सहावा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्था सचिव डॉ. वृंदा करंजेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी, प्रा. डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर, प्रा. निरजत अतकरी, डॉ. राजश्री, डॉ. सुनील आकुलनेरकर, डॉ. सुनील कापगते, डॉ. संदीपकुमार, डॉ. राकेश शेजवाल, प्रा. अजय कांबळे, अशोककुमार मीना, पुखराज लांजेवार, शाहीर सय्यद तसेच सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले आहे.



