निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : आज ( रवि. २८ सप्टें.) ला साकोली शहरातील श्री. रामभक्त हनुमान मंदिर तलाव वार्ड येथे स. १०:३० पासून भंडारा जिल्ह्यातील महिला सशक्तीकरणांची रणरागिणी, महिलांना एकत्र आणून आपल्या न्याय हक्कासाठी लढा कसा देता येईल ही शिकवण देऊन गेलेल्या रणरागिणी, तथा झांशीची राणी अभिनयात स्वातंत्र्य हक्क मिळवून घेण्यासाठी अंगात महिलांच्या अंगात उर्जा संचारणा-या महिला सुरक्षेची रणरागिणी स्व. गिताताई कापगते यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व दिव्यांगांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला आहे.
सदर शिबिराला रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करावे असे आवाहन आयोजक इंजि. सपन शरद कापगते व मित्र परिवारांनी केले आहे.
सदर कार्यक्रमात रक्तदान शिबीर, परीसरात वृक्षारोपण तसेच आज जे अपंग दिव्यांग व्यक्ती आहेत आणि आजही सामाजिक कार्यसेवेत आपले कर्तव्यदक्ष कार्य करून अपंगत्वावर मात करीत आहेत अश्या लढवय्या दिव्यांग हिरोंचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.
बोलताना आयोजक इंजि. सपन शरद कापगते यांनी सांगितले की, रक्तदान एक श्रेष्ठ दान आहे. आरोग्य नियमाने निरंतर रक्तदान केल्यानंतर व्ही गुप्त रोग, कावीळ, बी, क, मलेरिया, वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते. रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते. बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते. म्हणून रक्तदान शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते असे मत व्यक्त केले.
सदर शिबिराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे तसेच रक्तदान करण्यासाठी 9834337279, 8275286687 यावर संपर्क साधावा असे आवाहन इंजि. सपन कापगते व मित्र परिवार साकोली सेंदूरवाफा यांनी केले आहे.



