माणूस जीवनभर सुखाच्या मागे लागतो. सुख पायाखालून निघुन जातं. गेल्यावर कळतं की गेलं म्हणून. परंतु त्याचा आनंदी अनुभव मात्र घेऊ शकत नाही. दुःख आलेलं, दुःखात असण्याची जाणीव मात्र सतत होते. परंतू , सुख आणि दुःख हे दोन प्रकारचे असतात. एक शारीरिक आणि दुसरे मानसिक. या दोन्ही प्रकारच्या खऱ्या सुख आणि दुःखाची व्याख्याच आम्हाला माहित नाही.
कोणत्याही प्रकारच्या लोभामुळे किंवा अतिरेकांमुळे जे दुःख लाभते अर्थात कोणत्याही शारीरिक व बौद्धिक कष्टाशिवाय केवळ विकृत मेंदूच्या साहाय्याने इतरांच्या अज्ञानाचा लाभ उठवत जे मानसिकदृष्ट्या सुखी होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यातून त्यांना शारीरिक तात्पुरते सुख लाभते. परंतू मानसिक सुख कधीच लाभू शकत नाही.
यासाठी एक समीकरण किंवा सूत्रांनुसार प्रत्येकाने तपासून पाहावे…….
ज्या व्यक्तीला दररोज कोणतेही मद्यप्राशन न करता दगडासारखी नैसर्गिक झोप निदान 8 ते 9 तास लाभते. तो सर्वात सुखी व्यक्ती होय.
या समीकरणाच्या व्यतिरिक्त ज्यांना झोपावे लागते…….
त्यांच्या जीवनात अत्यंत दुःख आणि दुःख येतात. त्या दुखण्यावर जगात कुठेही उपचार नसतात.
निसर्गाने आपल्याला माता – पित्यापोटी जन्माला घालत असतानाच सर्व प्रकारचे संरक्षण कवच मातेच्या उदरातूनच मिळवून देतो ( अतीअल्प अपवाद सोडून द्या ). परंतू , आपण जसजसे आपण वाढत जातो, तसतसे सामाजिक वातावरणातील व्हायरस आपल्याला पंगू करत जातो.
धार्मिक, सामाजिक, कुसंस्कारामुळे जे निसर्ग आणि विज्ञानाच्या नियमांच्या विरुद्ध असतात. त्या संस्कारामुळे आणि आईवडिलांच्या संस्काराला दुर्लक्षित केल्यामुळे तो दुःखी होत जातो. नैसर्गिक पद्धतीने वार्धक्य येण्याच्या आतच त्याने नैसर्गिक नियमांना समजून आचरण न केल्यामुळेच शारीरिक आणि मानसिक दुःखातच मरता – मरता जगतो आणि जगता – जगता एक दिवस संपून जातो…………!
” माणसाला तीन फूट बाय सहा फूट एका बिछाण्याची गरज असताना राजमहालाची गरज ती काय, असे समजून तथागत भगवान बुद्धानी राजमहाल सोडला…..! “
आम्ही कशाच्या मागे लागतो……..?
आम्ही त्यांचा कोणता आदर्श घेतो…..?
सर्वकाही कळून आम्ही वळत का नाही……..?
या सर्व प्रश्नांची जाणीव आम्हाला केवळ एका क्षणासाठी का होईना होते……..
केंव्हा…….?
जेंव्हा,आम्ही कुणाच्या अंत्यविधीला जातो…….
त्या बांबू आणि त्यावर गवत, कडबा बांधणाऱ्या माणसाकडे जेंव्हा पाहतो………
तेंव्हा तो गवत, कडबा आणि बांबू एवढीच संपत्तीची आवश्यकता आम्हाला वाटू लागते…….!
परंतू , आम्ही त्या चितेला अग्नी देऊन घरी आलो की पुन्हा आम्ही त्या जंजाळात अडकून जातो……
आपल्याच त्या बांबू, गवत आणि कडब्याच्या तिरडीवर कायम झोपण्यासाठी…..
म्हणून आयुष्याचा प्रत्येक क्षण जाणीवेने जगूया. इतरांच्या दुःखात सामील होऊया ( आपल्या दुःखात इतरांनी सहभागी होण्याची अपेक्षा न करता), तरच या जीवनात आपले जीवन सार्थकी लागेल………
जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689


