Home Social सामाजिक अर्थसहाय्य योजनेतंर्गत पारशिवनी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची घोषणा…

सामाजिक अर्थसहाय्य योजनेतंर्गत पारशिवनी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची घोषणा…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारसिवनी..

         संजय गांधी निराधार योजना समितीचे गठन करण्यासाठी पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे काही व्यक्तींच्या नावाची शिफारस केली होती.नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या व्यक्तींना अनुसरून संजय गांधी निराधार योजना समितीला मंजुरी दिली आहे.

       संबधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. 

संजय गांधी निराधार योजना समितीचे पदाधिकारी खालील प्रमाणे…

१) अध्यक्ष राजु भोस्कर ( आमडी),सचिव – तहसिलदार पारशिवनी,सदस्य प्रेम भांडेकर भागीमहरी,(मागासवर्गीय (अ.जा./अ.ज.) अशासकीय प्रतिनिधी (एक)),सदस्य सौ. माधुरी नरेंद्र बावनकुळे पारशिवनी (महिला अशासकीय प्रतिनिधी),सदस्य आशीष घोटे पालोरा,सदस्य रोशन पिंपळामुळे पारशिवनी (इतर मागासवर्गीय/वि.जा.भ.ज. प्रर्वगातील अशासकीय प्नतिनिधी),सदस्य.गजानन गोरले कन्हान 

(सर्वसाधारण प्रर्वगातील अशासकीय प्रतिनिधी ),सदस्य सुधाकर कोदुजी गजबे सावळी 

(अपंग प्रर्वगातील अशासकीय प्रतिनिधी ),सदस्य मनोहर नारायणराव पाठक कन्हान

(संबंधित तालुक्यातील शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी ),सदस्य अनील आनंदराव वांढे,गुंढरी वांढे

(संबधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती,अशासकीय प्रतिनिधी ) तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी/मुख्य अधिकारी नगरपालीका/प्रभाग अधिकारी,नगर पंचायत(शासकीय प्रतिनिधी ) इत्यादींची घोषणा करण्यात आली.

           सर्व नियुक्त सदस्यांनी राज्यमंत्री अँड.आशिष जैस्वाल व जिल्हाचे पालकमंत्री तथा महशुल मंत्री चन्दशेखर बावनकुळे यांचे आभार मानले..