Home Maharashtra आळंदीत ग्रामीण रुग्णालयाला 100 बेडसाठी पाठपुरावा :- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर...

आळंदीत ग्रामीण रुग्णालयाला 100 बेडसाठी पाठपुरावा :- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर यांचे आश्वासन… — जिंतूर – सेलू मतदारसंघातील आळंदी पंचक्रोशी नागरिकांचा भव्य कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : जिंतूर–सेलू विधानसभा मतदारसंघातील आळंदी व पंचक्रोशी परिसरातील नागरिकांचा भव्य कौटुंबिक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर प्रमुख उपस्थित होत्या.

         या वेळी राज्यमंत्री बोर्डिकर यांनी नागरिकांशी संवाद साधत विविध विकासकामांचा आढावा घेतला. विशेषत: आळंदी ग्रामीण रुग्णालयात 100 बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः पाठपुरावा करून लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

          यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डिकर, पुणे भाजप जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद, परभणी भाजप जिल्हाध्यक्ष संजय भुमरे, डॉ.राम गावडे, वैजयंता उमरगेकर, प्रशांत कुऱ्हाडे, अजित वडगावकर, किरण येळवंडे, अमोल वीरकर, कालिदास वाडेकर, अरुण चौधरी, शिरीष कारेकर, सचिन गिलबिले, पांडुरंग वहिले, प्रिया पवार, शांताराम भोसले, अविनाश बोरुंदिया, राहूल घोलप, अशोकराव उमरगेकर, आकाश जोशी तसेच परभणी जिल्ह्यातील रहीवासी बहुसंख्येने उपस्थित होते.

          स्नेहमेळाव्यात महिलांसाठी आरोग्य व स्वावलंबन, युवांसाठी रोजगार संधी, तसेच पंचक्रोशीतील मूलभूत सुविधा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांमध्ये परस्पर संवाद वाढवून सामाजिक बांधिलकी जपणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डिकर यांनी सांगितले.