रामदास ठुसे
विभागीय प्रतिनिधी नागपूर…
प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस क्षणभर विश्रांती असा मानस असतो.पण ध्येयवेडी माणसे तोच वेळ सार्थकी लावत असतात.
स्वामी विवेकानंद आश्रमशाळा किरमिरी येथील विज्ञान शिक्षक प्रमोद साळवे यांनी विद्यार्थ्यां सोबत बगीच्यांची निगा व कचऱ्याची विल्हेवाट लावत साफसफाई केली.

प्रत्येक व्यक्ती मध्ये काही तरी खास असतं.सोमवार ते शनिवार सर्वांना कामाची घाई असते पण रविवारला सुट्टी असते.पण हा रविवार सेवेत जावा म्हणून कधी brighter mind activity,कधी साफसफाई तर कधी भाजीपाला लागवड असा रविवार एखाद्याच शिक्षकाचा असू शकतो.
मुलांसोबत भाजीपाल्याची छिलके जमा करत त्यापासून जैविक औषधे तयार करून तर कधी राखेचा वापर करून कीड नियंत्रण करण्याचा अभिनव उपक्रम राबवितात.
आश्रमशाळेत इतर शाळेपेक्षा खूप काही करण्यासारखं असते.कारण मुले 24 तास उपलब्ध असतात.फक्त त्यांच्यासोबत वेळ घालविणारी व्यक्ती असावी लागते.
जल,जंगल आणि जमीन यांच्याशी ह्या मुलाची नाळ लहानपणापासून जुळलेली असते.फक्त आपल्याला त्यांना दिशा दाखवावी लागते दशा आपोआप बदलून जाते.झाडावरची फुलणारी फुलं आणि निरागस बालकांच्या चेहऱ्यावरचे हसू मानवी मनाला आनंद देत असतो.

नागरिकशास्त्र पहिलीपासून शिकविले जावे असे सरांचे म्हणणे आहे.कारण ही शाळा,हे गाव,हा जिल्हा,ही राज्य आणि हा देश माझा आहे हे प्रत्येक बालकास मनातून वाटले पाहिजे.
इथे फेकणाऱ्या कचऱ्यामुळे माझं आणि माझ्या देशाचं पर्यावरणियदृष्ट्या मी नुकसान करतोय,मी लावलेल्या झाडाचं रक्षण करणे माझे कर्तव्य आहे.घाणीमुळे पसरणारे आजार ह्यामुळे माझ्या देशातील आरोग्य यंत्रणा वर ताण वाढतो आहे.
मोबाईल आणि संगणकाचा वापर करत असताना पुस्तकांचा ध्यास सोबत असावा ज्यामुळे आमची बौद्धिक प्रगती होईल हे जेव्हा शिक्षकांकडून पहिलीपासून शिकविले जातील तेव्हा ह्या देशात सुजाण नागरिक आणि समृद्ध पिढी उदयास येईल आणि तेव्हा आम्ही महासत्ता बनू,असेही प्रमोद सावळे गुरुजींचे म्हणणे आहे.



