Home देशविदेश बौद्धांनो, बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीच्या लढ्यात सहभागी व्हा :-...

बौद्धांनो, बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीच्या लढ्यात सहभागी व्हा :- भंते विनाचार्य यांचे उपस्थितांना आवाहन…

 पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

देसाईगंज :- हल्लीच्या बिहार राज्यातील बुद्धगया येथे सिद्धार्थ गौतम यांना संबोधी प्राप्त झाली होती. तेव्हापासून ते तथागत भगवान गौतम बुद्ध झाले. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्यानंतर त्यांनी तथागतांना संबोधी प्राप्त झाल्याच्या घटनेच्या स्मरणार्थ ई.स.पुर्व ३ रा व्या शतकात गया येथे भव्य अशा बौद्ध स्तुपाचे निर्माण केले.

           त्यात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेची स्थापना केली. यात वंदनारुपी बुद्ध पुजा पाठ करण्यासाठी भिक्खू संघ होता. त्यानंतर सम्राट अशोकाच्या दहाव्या वंशजाची त्यांच्याच शृंगनामक सेनापतीने छलकपट करून हत्या केली. आणि आपले राज्य प्रस्थापित केले. सोबतच सर्व बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करविण्यात आल्या. तेंव्हापासून तर आजतागायत सदर महाबोधी महाविहार पंड्याच्या ताब्यात आहे.

          पंड्यांचा असणाऱ्या ताब्यातून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी भव्य अशा आंदोलनाची सुरुवात झाली आहे. या लढ्याचाच एक भाग म्हणून दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली येथील जंतरमंतरवर भव्य असा आंदोलन रुपी लढा होत आहे. या लढ्यात उपस्थित सर्व बौद्ध उपासक – उपासिका आणि समस्त बौद्धांनी सहभागी होण्याचे आवाहन या आंदोलनाचे मुख्य सेनापती भंते विनाचार्य यांनी उपस्थितांना संबोधित करतांना केले.

            विहारावर पंड्याचे असणारे वर्चस्व संपुष्टात यावे म्हणून तत्कालीन भंते अनागरीक धम्मपाल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हयात असणारे भंते सुरई ससाई नागार्जुन आणि अन्य देशविदेशातील भिक्खू संघाने प्रयत्न केले.

            परंतु अजूनही यश मात्र आले नाही. म्हणून हा लढा तेवत ठेवण्याचे कार्य भंते विनाचार्य, भंते करुणाशिल व अन्य भिक्खू संघाने सुरूच ठेवले आहे. दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणऱ्या आंदोलनात देश-विदेशातील बौद्धांमध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यासह भारतभर धम्मध्वज यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनसंवाद साधण्याकरीता देसाईगंज येथील दिक्षाभुमीवर बुद्धीष्ट परीवार तालूका देसाईगंजच्या वतीने एका भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात ते बोलत होते.

          या धम्मध्वज व जनसंवाद यात्रेदरम्यान भंते राहूल, भंते संघरत्ने,भंते संघपाल व भंते कुणालकिर्ती उपस्थित होते.सोबतच महाराष्ट्र राज्यात या यात्रेचे आयोजन करण्याकामी ज्यांचे मोठे योगदान आहे ते राकेश धारगावे, नितीन गजभिये, धनंजय वैद्य, योगेश राऊत, स्मिता वाळके,सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या अध्यक्षा ममता जांभुळकर व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

         प्रास्ताविक भंते कुणालकिर्ती यांनी केले. संचालन राजरत्न मेश्राम व अरविंद घुटके यांनी तर आभारप्रदर्शन जागेश्वर माने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देसाईगंज तालुक्यातील सर्व बुद्ध विहाराच्या कार्यकर्त्यांसह आशिष घुटके, मुकेश खोब्रागडे, कुणाल लांडगे, दिनेश मेश्राम, राकेश लाऊत्रे, जागेश्वर माने, धर्मेंद्र तागडे यांनी अथक परिश्रम घेतले.