अबोदनगो चव्हाण..
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
अमरावती
चिखलदरा:-
मेळघाट अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील काटकुभ ग्रामपंचायत मध्ये
सेवा पंधरवाड्या अंतर्गत काटकुंभ येथील रस्त्याचे निरिक्षण करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती.
चिखलदरा तहसीलचे नायब तहसीलदार श्रीं.धावडे,मंडळ अधिकारी श्रीं.एस.टी.वडाळ,श्रीं.प्रताप धुर्वे ( बाबू),श्रीं.एम.पी.येवले तलाठीश्री.रवि धांडे तलाठी काटकुंभ व गावातील सरपंच ललिता बेठेकर,अशोक आलोकार, (सदस्य),कमलेश राठोड,मेशक चव्हाण,श्याम सतवासे,निलेश पंडोले यांच्या उपस्थित रस्त्याचे निरीक्षण करून शेतकरी आयुष भुता राठोड विरुद्ध गोकुल अथोटे यांच्यात रस्त्याचा आपसी समजोता करून प्रश्न निकाली काढण्यात आला.
सदर अभियान तालुक्यातील प्रत्येक गावात,जिल्हा अधिकारी अमरावती,उपविभागीय अधिकारी धारणी,श्री.जीवन.र. मोरणकर तहसीलदार चिखलदरा यांच्या मार्गदर्शनातं राबविण्यात येत आहे.



