उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात मौजा लावारी (आंबोली) आहे.(महाराष्ट्र राज्यांतर्गत घटना आहे.) मौजा लावारी येथील विवाहित महिला सौ.विद्या कैलास मसराम वय ४० वर्ष ही स्वतःच्या शेतात शेतकाम निमीत्ताने सकाळी गेली असता तिला वाघाचा बळी ठरावे लागली असल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक १८ सप्टेंबर २०२५,रोज गुरुवारला सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती भिसी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आणि वनपरिक्षेत्राधिकारी चिमूर आणि वनपरिक्षेत्राधिकारी भिसी यांना मिळतात त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनाकरीता शव चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.शवविच्छेदनानंतर सौ.विद्या कैलास मसराम यांच्यावर मौजा लावारी स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
सौ.विद्या कैलास मसराम या महिलेचे हिस्त्र पट्टेदार वाघाने शरिराच्या मुख्य भागात्ंर्गत वेगळे डोके केल्याने तिचा मृत्यू जाग्यावरच झालाय.
भिसी वनपाल/वनरक्षक वनपरिक्षेत्रातंर्गत हिस्त्र वाघाची बळी मौजा लावारी (आंबोली) येथील शेतकरी महिला ठरल्याने परिसरातील शेतकरी,नागरिक,मजूर महिला यांच्या मध्ये भिती निर्माण झाली आहे.
नेरी,शंकरपूर,भिसी,जांभुळघाट परीसरात हिस्त्र वाघ हे वारंवार मानव जातीवर हल्ला करीत असल्याने हिस्त्र वाघाचा बंदोबस्त वनविभागाने लवकरात लवकर करावे असे आवाहन चिमूर तालुक्यातील नागरिकांनी केले आहे.
तद्वतच हिस्त्र वाघ हे चिमूर तालुक्यात सोडले असल्याची चर्चा नागरिकात आहे.
घटनास्थळी चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी,भिसी ठाणेदार भोंगाळे,उपनिरीक्षक थिटे,उपनिरीक्षक वाघ,इतर पोलिस कर्मचारी,वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर,भिसी वनपरिक्षेत्र वनपाल औतकर आणि इतर वनरक्षक उपस्थित झाले होते.
चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर यांनी मृतक सौ.विद्या मसराम याचे पती श्री.कैलास मसराम यांना १० लाख रुपयांचा चेक सुर्पुद केलाय.याचबरोबर ५० हजार रुपये अंतीम संस्कार करण्यासाठी कॅश दिले.
वनपाल बोरकर हे सरपनासाठी गेलेल्या महिलांकडून प्रत्येकी १ हजार रुपये घेऊन त्रास देत असल्याने काही काळ घटनास्थळावर तनाव झाला होता.वनपाल बोरकर यांना पोलिसांनी चोख संरक्षण देत त्यांना नागरिकांच्या तावडीतून वाचवण्यात आले.
मात्र,वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर घटनास्थळावर आल्यावर त्यांनी परिस्थिती जाणून घेतली,वनपाल बोरकर विरोधातील माहोल शांत केला.



