उपक्षम रामटेके/शुभम गजभिये..
राष्ट्रीय बेरोजगार दिवसाचे औचित्य साधून चिमूर तालुकातंर्गत एन.एस.यू.आय.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतंर्फे,”प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार विरोधात भयंकर आक्रोश व्यक्त करीत,”नौकरी चोर,गद्दी छोड,च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रीय बेरोजगार दिवस हे दोन हॅशटॅग नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त का ट्रेंड झाले आहेत?
याचे कारण म्हणजे मोठ्या संख्येने देशातील विद्यार्थी आणि तरूण वर्ग रोजगारासाठी संघर्ष करत आहे.
कोरोना संकटकाळातंर्गत भारताची अर्थव्यवस्था कोलमडवण्यात आली होती.अशा परिस्थितीत शिक्षण आणि रोजगारासंबंधी समस्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या शिक्षण आणि बेरोजगार नितीच्या विरोधात असे विषय ट्रेंड झाले आहेत.
बेरोजगारीमुळे तरूणांचे हाल राष्ट्रिय सांख्यिकी कार्यालयाने (National statistics office/NSO) दिलेल्या माहितीनुसार,यंदा एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या जीडीपीमध्ये उणे 23.9 टक्क्यांपर्यंत झाली आहे.गेल्या 40 वर्षातली ही मोठी घसरण आहे.
एवढेच नव्हे तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार भारताचा शहरी बेरोजगारीचा दर 6 सप्टेंबरच्या आठवड्यात 8.32 टक्क्यांवर आला आहे.
बेरोजगार युवक आणि विद्यार्थी समस्याग्रस्त असतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,त्यांचे केंद्रीय मंत्री,त्यांचे खासदार,त्यांचे मुख्यमंत्री,त्यांचे राज्यस्तरीय मंत्री,त्यांचे आमदार,चूम बसून आहेत आणि बघ्याची भूमिका घेत आहेत.
भाजपा सरकारे भावनात्मक उपक्रमातंर्गत देशातील नागरिकांचे लक्ष सातत्याने भटकवत राहतात व भांडवलदारांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतात,त्यांच्यासाठी तिजोऱ्या खाली करतात हे आजवरच्या त्यांच्या धोरणावरुन लक्षात आले आहे.
यामुळे देशातील तरुण वर्ग,बेरोजगार,विद्यार्थी,महिला,युवती,शेतकरी,भाजपा सरकारमुळे परेशान झाले आहेत.ईव्हिएम मशीनचा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मत चोरी करण्यासाठी दुरुपयोग होत आहे.याचबरोबर पाहिजे तसा निकाल ते ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून आपल्या बाजूने वेळप्रसंगी फिरवत असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे..
यामुळेच भाजपा सरकारे हे बेरोजगार तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी,व शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या उन्नतीसाठी पुढे येताना दिसत नाही.
म्हणूनच एन.एस.यु.आय.संघटनेचे चिमूर तालुका अध्यक्ष श्रिकांत गेडाम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बेरोजगार दिनानिमित्त बेरोजगार युवकांनी,”प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारे यांच्या नितींचा,धोरणाचा विरोध करीत,” नौकरी चोर,गद्दी छोड,अशा गगनभेदी गर्जना केल्यात आणि घोषणातंर्गत तिव्र संताप व्यक्त केला…

