उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
लातूर :- भारत सरकारने 2O2O पासून नविन शैक्षणिक धोरण लागू करून कष्टकरी,दलीत आणि बहुजन समाजाला पुन्हा एकदा गुलामीच्या खाईत लोटन्याचे काम केले असून भारतीय संविधाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत असा घाणाघाती आरोप ‘ लसाकम ‘ चे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे यांनी केला आहे.
लातूर येथील प्रकाशनगर मधील गुरू करिअर अकादमी मध्ये ‘ बीसेफ ‘ या संघटनेच्या वतीने ” बदलते शैक्षणिक धोरण आणि बहुजन समाज ” या विषयारील परिसंवादात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी बीसेफ गव्हर्नीग कान्सीलचे चेअरमन एच.पी.कांबळे होते.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात थोटवे पुढे म्हणाले की,भारतीय संविधानाने बहुजनाना दिलेले हक्क – अधिकार संपुष्टात आणले जात असून नव्याने मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न सरकारकडून शिक्षणाच्या माध्यमातून केला जात आहे.
हे ओळखून कष्टकरी,दलीत, बहुजन समाजाने आपले अधिकार आबाधित ठेवण्यासाठी संघर्षाची तयारी करावी असे अवाहनही त्यांनी केले.
यावेळी बीसेफचे राजाध्यक्ष संजय मांजरम कर,’लसाकम’ चे नियंत्रक नरसिंग घोडके यांची समायोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता माने यांनी केले तर रामराव वाघमारे यांनी आभार मानले.



