Home उपक्रम मुख्यमंत्री समृध्द अभियान विकासाची मोठी संधी… — १७ सप्टेंबरपासून सुरू होणार...

मुख्यमंत्री समृध्द अभियान विकासाची मोठी संधी… — १७ सप्टेंबरपासून सुरू होणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- गावांच्या विकासासाठी शासन विविध योजना राबवत आहे. अभियान काळात आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ती, ग्रामस्वच्छता, सुंदर शाळा उभारणी, महिला सुरक्षा, सौरऊर्जेचा वापर, महिला बचतगटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला जाणार आहे.

        राज्यात दि.१७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार गावकऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सरपंच ज्योती भोंडेकर यांनी केले आहे.

          पारशिवनी तालुक्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पूर्वतयारी व जनजागृतीसह सदर योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी गट ग्रामपंचायत भागेमहारीच्या वतीने वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.