बाळासाहेब सुतार
निरा नरशिंहपुर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे लुमेवाडी तालुका इंदापूर येथील सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील गाजि-ए-मिल्लत सुफी संत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपूरवाले बाबा (रहे) यांचा ३२ वा उर्स शरीफ शनिवार (दि. १३) पासून सुरू झाला आहे. रात्री नऊ वाजता हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी यांच्या मजारवर (समाधी) संदल चढवण्याचा कार्यक्रम झाला आहे.
उरुसानिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश…
रविवारी दि .१४ उरुसाचा मुख्य दिवस…
कव्वालीचा मुकाबला…
मध्यप्रदेशातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सायंकाळी चार वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथून संदल मोठ्या उत्साहात निघून बाबांच्या मजारवर चादर चढवून उरूसास सुरुवात होते.
रविवारी (दि. १४) उरसाच्या मुख्य दिवशी रात्री आठ वाजता टीव्ही सिंगर वारीस साबरी (दिल्ली) व अदनान नाजा (मुंबई) व बशीर साबरी (कर्नाटक) यांच्यात ‘कव्वाली’ चा शानदार मुकाबला होणार आहे.
सोमवारी (दि.१५) सकाळी आठ वाजता जियारत होऊन उरूसाची सांगता होणार आहे. भाविकांसाठी दालचा भाताचा महाप्रसाद देण्यात येतो. भाविकांसाठी दालभाताचे लंगरखाना (महाप्रसाद) मुख्य उरूसच्या दिवशी हजरत फत्तेह मोहंमद जोधपुरीबाबा यंग ग्रुप व दर्गाह बांधकाम कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
उरूसानिमित्त दर्गाहवर सादिकभाई विजापूरकर यांनी आकर्षक व सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यानिमित्त मोठी यात्रा भरते. त्यात मिठाई, खेळणी, सौंदर्यप्रसाधनांची दुकाने थाटली जातात.
जोधपूरवाले बाबा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधव मोठी गर्दी करतात. हजरत सुफी वली चाँद पाशा (आवाटी), हजरत सुफी अरीफबाबा (मोमिनाबाद), हजरत यादअली साहब (छोटे बाबाजी राजस्थान), सज्जादा नशीन सुफी हसनैन कादरी (आवाटी शरीफ) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार होणार आहे. दर्गाह ट्रस्टी सुफी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा (रहे.) दर्गाह कमिटी, मुस्लिम जमात व ग्रामपंचायत लुमेवाडी यांनी नियोजन केले आहे.
लुमेवाडीतील हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपुरी बाबांच्या दर्गाहवर उरूसानिमित्त केलेली आकर्षक विद्युत रोषणाई (छाया : जावेद मुलाणी)



