कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी :- आर.आर.आबा पाटील सुंदरगाव योजने अंतर्गत २०२४-२५ च्या सुंदर गाव पुरस्काराची घोषणा करण्यात आली.या सुंदर गाव योजना अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील मौजा नायकुंड हे गाव,तालुका स्तरावर,”सुंदर गाव,पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
“पारशिवनी तालुका सुंदर गाव,ग्रामपंचायत पुरस्कार सोहळा ८ सप्टेंबर सोमवार रोजी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात संपन्न झाला.
ग्रामविकास विभागामार्फत आयोजित या सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.पारशिवनी तालुक्यातून ग्रामपंचायत नयाकुंडला प्रथम पुरस्कार मिळाला असून,सरपंच सुधिर अवस्थी आणि ग्राम विकास अधिकारी,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.




