Home Maharashtra आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आरोपीला तात्काळ अटक… — ६२ वर्षीय अशोक मालवियांचा अमानवीय...

आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आरोपीला तात्काळ अटक… — ६२ वर्षीय अशोक मालवियांचा अमानवीय अत्याचार..  — अल्पवयीन मुलीने दिलाय बाळाला जन्म,चिखलदऱ्यात संतापाची लाट…

 अबोदनागो चव्हाण 

जिल्हा प्रतिनिधी अमरावती 

       दखल न्युज भारत…

चिखलदरा :- आदिवासी बहुल्य चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 

       ६२ वर्षीय अशोक मालवीय या नराधमाने आपल्या घरी काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.यामुळे पीडित मुलगी गर्भवती

झाली व अचलपुर येथील रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

      ही धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर गावकरी आक्रोशित झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी,अशी मागणी होत आहे. 

        महिलांनी व तरुणांनी आरोपीला तातडीने अटक करून जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा द्यावी,अशी जोरदार मागणी केली आहे.काही संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

      या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अशोक मालवीय विरुद्ध बलात्कार,पोक्सो कायदा तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन धारणी येथिल पोलिस उपविभागीय अधिकारी स्वतः तपास करत आहेत.

         आरोपीला ताबडतोब अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे.

       पीडित मुलगी सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असून तिची मानसिक अवस्था ढासळली असल्याचे समजते.

      अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात,अशी मागणी सर्वत्र होत आहे.

       या घटनेने मेळघाट हादरून गेला आहे.आदिवासी बहुल्य भागात शिक्षण,जागृती आणि सुरक्षा या बाबतीत शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.