आम्हाला (भारतीय जनतेला) कुणीही वाली राहिलेला नाही……..
आमच्यासाठी केवळ संविधान………!
मा.राष्ट्रपती प्रधानमंत्र्याचे बाहुले………
मा.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश RSS आणि तिथे बसविणाऱ्याचे उपकार फेडण्यातच दंग……….
मा.उच्चं न्यायालय सुद्धा आम्हाला न्याय न देता केवळ निकाल देतं…….
जिल्हा न्यायालये सुद्धा आरोपी आणि फिर्यादीच्या अरग्यूमेन्टमधून सदसदविवेक बुद्धीच्या माध्यमातून सत्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडतात. परिणामी इथे सुद्धा न्याय न मिळत निकालच मिळतात म्हणून उच्चं न्यायालयात फायलिंचा भार वाढत आहे……….
JMFC अर्थात कनिष्ठ स्तर तालुका न्यायालयात सुद्धा न्याय मिळत नाही. हे न्यायाधीश सुद्धा विकल्या जात जात असल्यामुळे इथेही न्याय मिळत नाही……….
मा.प्रधानमंत्री तर विश्वगुरू बनण्यात आणि पक्षांतर्गत तसेच विरोधकांत दबाव टिकविण्यात गुंग……..
केंद्रीय मंत्री मोदीच्या दबावात राहून लाच पदरात पाडून घेण्यात मशगुल………..
लोकसभा सदस्य आपापल्या पक्षाच्या अधीन राहून जे मिळेल त्यात समाधान राहून माजी खासदार म्हणून का होईना आजीवन लाभ मिळविण्यात दंग……….
राज्यसभा सदस्य सहा वर्षासाठी का होईना बघ्याची भूमिका घेऊन झोपा काढायला मोकळे…….
कोणत्याही राज्याचे मा.राज्यपाल तिथे बसविणाऱ्याच्या आदेशाचे गुमान पालन करण्यात सॅल्यूट मारणारे……….
कोणत्याही राज्याचे मा.मुख्यमंत्री आपल्याच पक्षाच्या आणि मित्र पक्षांच्या साठीच राज्य चालवीणारे सरकार……….
कोणत्याही राज्याचे मा.मंत्री भ्रष्टाचार करून आपलेच हात धुऊन घेण्यात दंग………
कोणताही विधानसभा सदस्य केवळ कार्यकर्त्याच्या गरड्यात राहून जनतेला पायदळी तुडवीणारा……..
कोणताही विधान परिषद सदस्य सहा वर्षासाठी सभागृहात हास्याचे फवारे उडविण्यात मशगुल……..
कोणताही महापौर हा आपल्या पक्षाच्या किंवा अपक्ष असेल तर इतर श्रीमंत सदस्यांच्या पदराआडून आर्थिक स्वार्थाने बरबटणारा……..
कोणताही नगराध्यक्ष सुद्धा शहरातील रिकाम्या जागावर डोळा ठेऊन कुणालाही देऊन गडगंज संपत्ती कमविणारा……..
कोणताही नगरसेवक नालीतून पैसे खाणारा, स्मशान भूमितून पैसे खाणारा, रस्त्यातून टक्केवारी घेणारा…….
कोणताही जि.प.अध्यक्ष आपल्या पक्षाच्या आदेशाआडून जिल्ह्यात दहशत बसविण्यात पटाईत……….
कोणताही जि.प. सदस्य आपल्या सर्कलमध्ये कामे काढून टक्केवारी जमा करून करोडपती बनण्याची स्वप्ने बघणारा………
पंचायत समिती सभापती मिळालेल्या सुवर्ण संधीचा लाभ उठविणारा……….
पंचायत समिती सदस्य मिळेल तेवढे स्वार्थ साधण्यासाठी कुणाशीही हातमीळवणी करणारा……..
कोणताही सरपंच गावचा प्रधानमंत्री स्वतःला समजणारा, ग्रामसेवक आणि तलाठ्याशी दिलजमाई करून सर्व सरकारी योजना आपल्या स्वार्थासाठी राबवणारा…………
कोणताही ग्रामपंचायत सदस्य कुठेही विरोध न करता फुटकळ स्वार्थासाठी कुणीकडेही निवडून आल्यावर कोलांटउडी खाणारा…….
केंद्र सरकारच्या सर्वच खात्याचे आणि लोकसभा व राज्यसभागृहाचे मुख्यसचिव आणि इतर सचिव, राष्ट्रपतीचे सचिव हे सर्व आपल्या सरकारचे, वरिष्ठांचे कोणतेही जुलमी आदेश पाळण्यात धन्यता मानणारे……….
कोणत्याही राज्याच्या राज्यपालाचे तसेच कोणत्याही राज्यसरकारच्या खात्याचे मुख्यसचिव आणि इतर सचिव हे सुद्धा ज्या पक्षाचे सरकार असेल, त्या सरकारला झुकते माप देणारे………
कोणताही विभागीय आयुक्त केवळ सत्ताधाऱ्यांचेच आणि स्थानिक सत्ताधारी पक्षाचे आदेश शिरसावंद्य मानल्यामुळे पगाराला हातही न लावता परदेशात आपल्या मुलांना शिक्षण देणारा……….
कोणताही जिल्हाधिकारी वरिष्ठांचेच आदेश पाळणारा, कोणताही मोर्चा आला तर मी गैरहजर असल्याचा भास दाखवणारा आणि केवळ राजकीय नेत्यांचेच आदेश पाळणारा……..
कोणताही तहसीलदार केवळ स्थानिक आमदार, त्यांचे कार्यकरते यांचीच कामे करणारा शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करणारा……
कोणताही तलाठी पैसे खाऊन कोणत्याही हतबल आणि अज्ञानी गरीब शेतकऱ्याची शेती श्रीमंताकडून पैसे खाऊन नावावर करून देण्यात पुढाकार घेणारा……..
कोणताही जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा राजकीय नेत्यांचीच भलावण करणारा कारण टक्केवारी त्याच्या घरात आपोआप येतच असते………
कोणताही बी.डी.ओ. म्हणजेच गट विकास अधिकारी राजकीय नेत्यांचे बटीक होऊन आपल्या खुर्चीला श्रीमंत्यांचे गुलाम बनविणारा…….
कोणताही ग्रामसेवक हतबल शेतकरी आणि गावकरी यांना अनेक प्रकारे सरपंचाला हाताशी धरून गंडवणारा……….
कोणताही पोलीस पाटील गावात कोणताही फौंजदारी गुन्हा घडल्यानंतर फौंजदाराच्या संगनमताने आणि स्वतःच्या मध्यस्थीने प्रकरण दडपून टाकणारा…….
कोणताही कोतवाल ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवक आणि तलाठी यांची बॅग सांभाळणारा (एवढाच काय तो प्रामाणिक दिसणारा )…….
केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव गृहमंत्र्यांचे आणि केंद्रसरकारचेच देशात आणि केंद्रशासित प्रदेशात कुठेही केवळ आदेश पाळणारा आणि जनतेला बंदूकीच्या धाकावर भेडसावणारा……
कोणतेही राज्याचे पोलीस महासंचालक सत्ताधाऱ्यांचे आदेश गुमान अंमलबजावणी करणारे…….
कोणतेही विभागीय पोलीस परिमंडळ अधिकारी सुद्धा राजकीय पक्षांचे विशेषतः सतराधाऱ्यांचेच आदेश पाळणारे……
कोणतेही सी.पी. पोलीस आयुक्त किंवा कोणतेही एस.पी. पोलीस अधीक्षक हे सुद्धा स्थानिक नेते व वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांचेच संरक्षण आणि आदेश पालन करणारे……..
कोणतेही ACP, DYSP अर्थात सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपाधीक्षक, किंवा पोलीस निरीक्षक हे सर्व सर्वच राजकीय नेत्यांची बाहुले झालेली विशेषतः सतराधाऱ्यांचे आणि श्रीमंतांचे बटीक झालेले…….
पोलीस कॉन्सस्टेबल अर्थात जमादार तर वरिष्ठांच्या आदेशाने पेन आणि कागद यांना संपवण्यातच सर्व्हिस करणारे……..
पोलीस शिपाई अर्थात हवालदार तर हातात दांडके घेऊन 24 तास कुठेही रस्त्यावर उभे राहून राजकीय नेत्यांना व वरिष्ठांना सॅल्यूट मारण्यातच टांगती तलवार घेऊन निवृत्त होण्याची वाट पाहणारा…….
कोणत्याही केंद्रीय किंवा राज्याच्या किंवा खाजगी विद्यापीठाचा कुलगुरू (पी. एच. डी. धारक डॉक्टर) आपल्या अधिकारात असताना केवळ नैतिकता नसल्याकारणाने आपल्या दुधारी शिक्षणाच्या तलवारीचा वापर सरकारच्या मर्जिनुसारच करणारा……..
कोणत्याही महाविद्यालयाचा प्राचार्य नैतिक कर्तव्य बाजूला सारून केवळ बचावात्मक पवित्रा घेऊन महाविद्यालय चालवीणारा…….
कोणताही पी.एच. डी. धारक डॉक्टर प्रा. हा विद्यार्थ्यांपुढे आपल्या नैतिक चरित्र्यातून आचरणातून आदर्श निर्माण न केल्यामुळे महाविद्यालये बेरोजगारांचा कारखाना निर्माण करणारे……..
कोणतेही कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक हे सुद्धा शील आणि चरित्र्यातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण करण्यात कमी पडल्यामुळे विद्यार्थी न घडवता बिघडवणारे……..
उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळातील शिक्षक यांना तर परीक्षा केंद्रित विद्यार्थी निर्माण करून टक्केवारी कडेच लक्ष देण्यासाठी अभ्यासक्रम संपवणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आदर्श शिक्षक न होता केवळ भरमसाठ पगारातून मोठ्या शहराच्या ठिकाणी ऐशा रामाचे जीवन जगण्यात धन्यता मानणारे……..
प्राथमिक शाळांच्या शिक्षकांना तर जिथे पाठवले तिथे जाऊन नोकरीं करावीच लागते. प्रत्यक्ष संपर्क तर बालकांशी यांचाच येतो. यांच्यावरच जास्त जबाबदारी असल्यामुळे ही मंडळी ईमानइतबारे संस्कार देण्याचा प्रयत्न करतात……
“वरील सर्व (अधिकारी, कर्मचारी) मंडळी ही आमच्या भारतीय जनतेच्या ( विशेषतः सर्वसामान्य जनता आणि जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी) जगता – जगता मरण्याच्या आणि मरता- मरता जगण्याच्या धडपडीतून जो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आर्थिक कर भरतो, त्यातूनच केंद्र आणि राज्याची तिजोरी भरत असते. त्यातूनच वरील सर्व मंडळी भ्रष्टाचार करून, पगारातून, सवलतीतून, विविध सुवीधेतून सुखाचे, विलासाचे, ऐष आरामाचे, चैनीचे, जीवन जगत असतात.
दुसऱ्या बाजूला जर आम्ही (सर्वसामान्य भारतीय जनता आणि अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी अर्थात जागाचा पोशिंदा) यांच्या नितिभ्रष्ट आणि आर्थिक भ्रष्टाचारामुळे प्रथक्ष आणि अप्रत्यक्ष कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची वेळ येत असेल, तर आम्हाला कोण वाली आहे…..????????
अशा कठीण आणि बिकट परिस्थितीत केवळ आणि केवळ वरील कोणतीही मंडळी आमची संरक्षण करूच शकत नाही हे गेल्या 75 वर्षात आणि विशेषतः11 वर्षांपासून सिद्ध झाले आहे. तेंव्हा वरील परिस्थितीला पूर्वपदावर किंवा यांना वठणीवर आणायचे असेल, तर आम्हांला केवळ आणि केवळ…….
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधानच संरक्षण करू शकते……
त्यासाठी केवळ आम्हाला जात, धर्म पंथ आणि अनितीच्या मार्गाने मिळविलेल्या संपत्तीच्या कोरड्या अहंकाराला बाजूला सारून केवळ………
आम्ही भारताचे लोक म्हणून जागृत होऊन, हे संविधान अर्थात आमचे मूलभूत अधिकार, हक्क आणि कर्तव्य यातून हे संविधान स्वतःप्रत अधनियमित आणि अंगीकृत करण्याची केवळ शपथ न घेता कृतीतून सिद्ध करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे……
अन्यथा वरील मंडळी निर्माण करीत असलेल्या “ब्लॅक होल ” मध्ये आपल्याला विरघळून जावं लागेल……..!
त्यासाठी सर्वात प्रथम कर्तव्य म्हणून आपल्याला या EVM + VVPAT ला आपल्या मतदान प्रक्रियेतून हद्दपार करावे लागेल……….
त्यानंतर इतर प्रश्नांकडे आपल्याला मोर्चा वळवावा लागेल……
जागृतीचा कृतीशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद,7875452689



