दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
आंबेडकर वाचनालय कर्नलबाग,नागपूर द्वारा भाद्रपद पोर्णिमा निमीत्ताने बुध्द आणि त्यांचा धम्म व व्यक्तिमत्व विकास विषयावर व्याख्यान दिनांक ७ सप्टेंबर रोजी रवीवारला होणार आहे..
कार्यक्रमाची वेळ दु. 1.00 वाजता असून कार्यक्रमाचे स्थळ पवित्र दिक्षाभूमी चंद्रपुर आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक गोटेकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी दिक्षाभुमी चंद्रपूर हे असणार आहेत तर प्रमुख वक्ता म्हणून प्रा.सुभाष शेंडे धम्म प्रशिक्षक हे असणार आहेत.
प्रमुख पाहुणे विलास गजघाटे साहेब (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभूमी ट्रस्टी,नागपूर),रोशनी सिध्दार्थ गायकवाड मॅडम (महिला आघाडी अध्यक्षा, जि.प.मागासवर्गीय शिक्षण संघटना, नागपूर),हे असणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयु.शेषराव सहारे (संविधान अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ता),आयु.भाऊराव दूर्योधन (शहर अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा) हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजक आयु.सुनिल मनोहर भोसले अध्यक्ष,आंबेडकर वाचनालय,कर्नलबाग,नागपूर,आयु.प्रियंका वनकर धम्म प्रचारिका,चंद्रपुर हे आहेत.
दिक्षा भुमी चंद्रपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला सदर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहान्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



