शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत मौजा शंकरपूर येथे शेतकऱ्याचे धान्य खरेदी करण्याचे व ते विक्री करण्याचे बघेल ट्रेडर्स नावाचे शंकरपूर ते भिशी कॉर्नर वरती दुकान आहे. त्यांनी दुकानात धान्याच्या पर्स मध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेले सोन्याचे दागिने धान्य खरेदी केल्यानंतर मिळून आले. त्यांनी ते दागिने शेतकऱ्याला परत करून माणुसकीचा परिचय दिला आहे.
वाकरला येथील शेतकरी विश्वास तुमराम यांनी घरून 30 किलो गव्हाचा कट्टा विक्रीसाठी शंकरपूर येथील बघेल ट्रेडर्स येथे आणला. परंतु त्यांच्या पत्नीने गव्हामध्ये सोन्याच्या दागिन्याची पर्स (अंदाजे किंमत दोन लाख रुपये) लपवून ठेवलेले होते. परंतु त्यांना याबाबत माहिती नसल्याने तो गव्हाचा कट्टा बघेल ट्रेडर्स येथे विकण्यात आला.
परंतु घरी गेल्यावर काही वेळानंतर त्या गव्हाच्या कट्ट्यामध्ये सोन्याचे दागिने असल्याची माहिती पत्नीने दिल्यावर विश्वास तुमराम यांना धक्काच बसला. नंतर त्यांनी कोणताही उशीर न करता शंकरपूर गाठले व गव्हामध्ये सोन्याची पर्स असल्याची माहिती बघेल ट्रेडर्सचे मालक कपिल बघेल यांना सांगितली. लगेच त्यांनी दुकानांमध्ये असलेल्या सर्व गव्हाच्या कट्ट्यामध्ये त्या सोन्याचे दागिने असलेल्या पर्सचा नोकरांच्या मदतीने शोध घेतला असता, एका कट्ट्यामध्ये ती सोने असलेली पर्स आढळून आली.
ती मिळालेली पर्स कपिल बघेल यांनी माणुसकीचा परिचय देऊन विश्वास तुमराम यांना परत केली. ती पर्स परत मिळताच तुमराम यांना मोठा आनंद झाला. व त्यांनी कपिल बघेल यांचे आभार मानले. या घटनेने कपिल बघेल यांचे सोशल मीडिया ग्रुप तसेच प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केल्या जात आहे.



