बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या गणेशोत्सवा निमित्त या वर्षी जीवनावश्यक आसा चांगलाच आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सव साजरा झाला.
कार्यक्रमाचे आयोजक मलिक नगरचा बादशहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पिंपरी बुद्रुक या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्याचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये 55 हून अधिक रक्तदात्यांनी भाग घेऊन रक्तदान करण्याचा हाक्क बजावला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सराटी गावचे तरुण नेते व प्रगतशील बागायदार भैय्यासाहेब कोकाटे मित्र परिवारा सह, मच्छिंद्र खटके, डा शाहा ,आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी आपली उपस्थिती लावली.
या प्रसंगी भैयासाहेब कोकाटे बोलत असताना म्हणाले की, पिंपरी ब्रुदुक पंचक्रोशीतील सर्वच तरुण मित्राच्या विनंतीला मान देऊन रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला मि आलो याचा मला आज आनंद आहे.
यानिमित्त गणरायाला एकच माझी विनंती आहे की शेतकरी राज्या सुखी आणि समाधानी राहु दे. शेती सुजलाम आणि सुफलम राहून चांगली पिकुन शेतमाला चांगला भाव मिळु दे व मेघ राजाची अशीच साथ राहून सुख समाधानाने जीवन जगू दे अशी प्रार्थना गणराया चरणी भैय्यासाहेब कोकाटे यांनी केली.
इथून पुढेही सार्वजनिक अथवा कोणताही कार्यक्रम असो या बद्दल माझे नेहमीच येण्यासाठी प्रयत्न राहतील.
सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड सेंटर यांच्या सहयोगाने मलिक नगरचा बादशाह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पिंपरी बुद्रुक सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने सकाळी 10 ते 5 या वेळेत 55 हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान घेण्यात आले. ब्लड सेंटरच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र ही देण्यात आले.
गणेश मंडळाच्या वतीने आलेल्या रक्तदात्यास चहापाणी, बिस्किट, फळे, नाष्टा पण देण्यात आला.
संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत टाळ आणि मृदंगाच्या गजरात गणपती समोर भजनही घेण्यात आले. यासाठी वारकरी व भजीनी मंडळ मोठया संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष, पिंपरी बुरुक यथील समस्त ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आली.
मलिक नगरचा बादशाह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.
शेवटी सर्व मान्यवर व ग्रामस्थ भजनी मंडळ यांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.



