Home Vidarbha नेरी येथील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था…

नेरी येथील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

    चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथील प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्यांची फारच दुरावस्था झाली आहे तरीही याकडे मात्र कोणाचेही अजिबात लक्ष नाही 

   गावातील हा मुख्य रस्ता असुन बाजार चौकातील रस्त्याला जोडला गेला आहे 

   हा रस्ता बाजार चौकातील रस्त्याने जाण्यापेक्षा या रस्त्याने वाहतूक धारक जाण्यासाठी पसंत करतात परंतु या रस्त्याची इतकी दुर्दशा झाली आहे की गाडी चालवणे सुद्धा मुश्किल चे झाले आहे, वाटसरुंना देखील हा रस्ता त्रासाचा झाला आहे 

       विशेष करून हा रस्ता सत्ताधारी गावचे दोन पुढारी यांच्या घरासमोरील आहे तरी देखील हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या सुधारणेसाठी अश्रू ढाळीत आहे 

      या रस्त्याचे बांधकाम केव्हा होईल असा प्रश्न गावकरी नागरीक या पुढाऱ्यांना विचारीत आहेत.