शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथील पेठ विभागातील रहिवासी मानीक बुळे यांचे घर काल रात्री एक वाजताच्या दरम्यान कोसळल्याने निवारा या पावसाळ्यात कुठे करायचा असा गंभीर प्रश्न बुळे यांच्या समोर उभा ठाकला आहे.
गेल्या आठवडाभरापासून नेरी येथे मुसळधार पाऊस येत असल्याने गोरगरीब जनतेच्या घराला धोका निर्माण झाला असून अनेकांच्या घराला क्षती पोहचली आहे. यातच पेठ विभागातील मानिक बुळे हे सायंकाळी जेवून आटोपून झोपी गेले असता मुसळधार पावसाच्या तडाख्यात त्यांचे राहते घर कोसळले सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही.
मात्र घरातील जिवनोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे चिमुर तहसील प्रशासनातील संबंधितांनी यांची तात्काळ दखल घेवून बुळे परिवारास नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.



