Home Maharashtra दर्यापूर अमरावती,दर्यापूर मुर्तीजापुर रोड लगत पथदिव्यांची निर्मिती करा… — शहरातील नागरिकांची...

दर्यापूर अमरावती,दर्यापूर मुर्तीजापुर रोड लगत पथदिव्यांची निर्मिती करा… — शहरातील नागरिकांची एकमुखी मागणी… — दिवसाकाठी अपघाताचे प्रमाण वाढतेच…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

         गेल्या अनेक वर्षापासून दर्यापूर अमरावती रोड व दर्यापूर मुर्तीजापुर रोड हा पथदिव्या विनाच असल्याने दिवसाकाठी अपघाताची मालिका सुरूच आहे दर्यापूर अमरावती मार्ग व मुर्तीजापुर मार्ग हा अंधारमय असल्याने येथील नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

          शालेय विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक व सामान्य नागरिक यांना मार्गक्रमण करत असताना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तर पथदिवे नसल्याकारणाने अनेक सरपटणारे प्राणी हे थेट मार्गक्रमण करणाऱ्याच्या अंगावर येत असल्याने सर्पदंशाची संख्या वाढत चालली आहे.

          दर्यापूर अमरावती मार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून दिवसभरात एक अपघात हा नित्यनेमाने घडतच आहे.तरी याची जाणीव पालिकेला नसल्याकारणाने नागरिकांनी तीव्र संताप संबंधित विभाग व पालिका प्रशासनावर व्यक्त केला आहे.

           शहरातील नागरिक आपला नियमित कर पालिकेला व संबंधित विभागाला अदा करीत असतात परंतु त्याच्या मोबदल्यात कुठलाही मोबदला हा मिळत नसल्याने शहरातील नागरिक हतबल झाले आहे. तरी या अति महत्त्वाकांक्षी बाबीची दखल संबंधित विभागाने घेऊन तात्काळ दर्यापूर अमरावती व दर्यापूर मुर्तीजापुर रोड लगत पथदिव्यांची निर्मिती करावी असे जनमानसातून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया

       दर्यापूर शहर हे सर्व गुण संपन्न असून काही बाबतीत सध्या मागे सरलेले दिसत आहे. दर्यापूर अमरावती व दर्यापूर मुर्तीजापुर रोड हा पथदिव्या विना असल्याने लहान बालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर महिलांना सुद्धा असुरक्षितता वाटत आहे.

कपिल पाटील पोटे सामाजिक कार्यकर्ते दर्यापूर…

            दर्यापूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून पथदिव्यांची दुरावस्था झाली आहे याला संबंधित विभागच जबाबदार असून नागरिकांची असुरक्षितता दिवसेंदिवस वाढतच आहे.  दर्यापूर अमरावती दर्यापूर मुर्तीजापुर रस्त्यालगत पथदिवे नसल्याने जनावरे आपल्या मर्जीनुसार रस्त्याच्या मधोमध निद्रा करीत असतात. त्यामुळे अपघात मालिका सुरूच आहे पालिका प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करणे उचित आहे.

   आतिश शिरभाते 

दर्यापूर शहर काँग्रेस अध्यक्ष