Home Breaking News ब्रेकिंग न्युज… काटकुंभ येथील पाण्याच्या टाकीवरुन कैलासने उडी घेऊन केली आत्महत्या…...

ब्रेकिंग न्युज… काटकुंभ येथील पाण्याच्या टाकीवरुन कैलासने उडी घेऊन केली आत्महत्या… — जागेवरच अंत,काटकुंभ येथील घटना..

अबोदनगो चव्हाण 

तालुका प्रतिनिधी

चिखलदरा :- 

      कैलास कास्देकर यांनी पाण्याच्या टाकीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची शंका असली तरी त्याची हत्या केली असल्याचा आरोप आईवडिलांनी केला आहे.

      कैलास सकाळी घरुन चार वाजता निघुन गेला होता.तो फिरायला गेला कि काय असे घरच्यांना आई वडिलांना वाटले. पण शुक्रवारी सकाळी अंदाजे पांच ते सहाच्या दरम्यान काटकुंभ येथील पाण्याच्या टाकी जवळ शेजारील एका महीलेला मृताअवस्थेत एक पुरुष दिसला.

         या बाबत जवऴ असलेल्या पोलीस चौकी काटकुंभला घटना क्रमाबाबत सागीतले‌.काटकुंभ येथील पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्याची ओळख पटली व सदर युवक हा काटकुंभ येथीलच आहे असी खात्री झाली.

       मृत कैलास तुलसीराम कास्देकर वय 30 वर्ष याने आत्महत्या केली.पण आई वडीलाचे बोलने असे आहे की माझ्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची कोणी हत्या केली असा आहे असा आरोप आई वडीलानी केला आहे.

      या बाबत घटनास्थळी पंचनामा केला.यावेळी ग्रामपंचायत काटकुंभ येथील सरपंचा ललीता बेठेकर व कमलेश राठोड यांनी एंबुलेंसची सुवीधा करुन दिली आणि मृतदेह चुरणी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आणि ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे पोस्टमॉर्टम करुन मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.

      चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली काटकुंभ पोलीस चौकी तिल किसन भिलावेकर सतीश जामोद पुंढील तपास करित आहे.