Home देशविदेश ईव्हीएम मशीन द्वारा,”मत चोरीचा,पुढे आलेला मुद्दा राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह इतर पक्ष तडीस...

ईव्हीएम मशीन द्वारा,”मत चोरीचा,पुढे आलेला मुद्दा राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह इतर पक्ष तडीस नेणार काय? — लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी केंद्र सरकारला व केंद्रीय निवडणूक आयोगाला,”बैलेट पेपर द्वारे सार्वत्रिक निवडणूका घेण्यास,भाग पाडतील?

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक

       ईव्हीएम मशीन द्वारा मते चोरुन निवडून येणे व सत्ताधारी होणे हा मागील २ दशकातील प्रकार आहे.पण,तेव्हा नाकापेक्षा मोती जड झालेला नव्हता.

        म्हणजेच तात्कालिन केंद्र व राज्य सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या आड नागरिकांच्या अधिकारांवर अंकुश लावले नव्हते आणि भांडवलदारांच्या पुढे सत्तेला झुकते माप दिले नव्हते.

           याचबरोबर देशातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या विरोधात नवीन कायदे अमलात आणुन त्यांना अडचणीत आणण्याचे व परेशान करण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात झाले नव्हते.

      मात्र,काँग्रेसच्या सत्ताकाळात सुध्दा धर्मद्वेषाच्या व जातीय द्वेषाच्या छडा या देशातंर्गत अनुसुचित जाती व जमातीच्या नागरिकांना,विद्यार्थ्यांना,महिलांना,युवतींना,विद्यार्थीनींना,बेरोजगारांना,गरीबांना सोसाव्या लागल्या,सहन कराव्या लागल्या होत्या हे कटू वास्तव नाकारता येत नाही.

         मात्र आताच्या केंद्र व राज्य सत्ताकाळात खुलेआम भ्रष्टाचार करणेवाल्यांना व जातीय दंगली घडवून आणणेवाल्यांना,धर्म द्वेष व जातीय द्वेषासाठी पोषक वातावरण निर्माण करणेवाल्यांना,देशातील व राज्यातील शांतता भंग करणेवाल्यांना,सत्तेद्वाराच बिनधास्त संरक्षण दिल्या जात आहे हे भारत देशातील नागरिकांचे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल.

        याचबरोबर आताचे केंद्र सरकार व आताचे राज्य सरकार अनुसूचित जाती व जमातीचा विकास निधी कमी करुन इतरेत्र वळवतो आहे आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव न देता रासायनिक खतांच्या व किटकनाशकांच्या किमतीत भरमसाठ वाढ करतो आहे.

         अर्थात आताचे केंद्र सरकार व राज्य सरकारे हे भांडवलदारांच्या हिताचे नेहमी निर्णय घेतात आणि देशातील नागरिकांना व शेतकऱ्यांना अनेक कारणांनी अडचणीत आणतात हे उघड आहे.

           तद्वतच आताच्या केंद्र व राज्य सरकारने हजारो जिल्हा परिषद शाळा बंद तर केल्याचं,पण उच्च शिक्षण घेणारी व्यवस्था महागाडी करुन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दरवाजे बंद केले.

       एवढेच काय तर सरकारी नौकर भरती कंत्राटदार पध्दती नुसार सुरू करुन नौकरीवर रुजू व्हायच्या पहिलेच शोषण कार्यप्रणालीला मान्यता दिली.

       म्हणजेच नौकर भरती प्रक्रिया अंतर्गत कंत्राटदारला मालामाल करणे व करोडो रुपयांच्या मलिंद्यात बिनदिक्कत हात साफ करणे,अशी भ्रष्ट कार्यपध्दत केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेली आहे.

          याचबरोबर ईव्हीएम मशीन द्वारा मतांची चोरी करून सत्ताधारी होण्याची नविन कार्यपध्दत भाजपाने खुलेआम सुरू केली.

         म्हणूनच भाजपाचे काही मंत्री,खासदार,आमदार व पदाधिकारी देशातील नागरिकांना,शेतकऱ्यांना नेहमी अपशब्दात बोलतात आणि म्हणतात आम्हाला मतदारांच्या मतांची गरज नाही तर आम्ही ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडून येतोच..

         अशा पध्दतीने बेलगाम बोलण्याची परिभाषा म्हणजे लोकशाही प्रणालीला पायदळी तुडवून हुकुमशहा पध्दतीने वाटचाल करणे होय.हुकुमशाही पध्दतीला पोषक वातावरण निर्माण करणे होय,देशातील नागरिकांचे दमन आणि शोषण करणे होय.

           याचबरोबर मुजोर प्रवृत्ती अन्वये पाहिजे तसे लोक विरोधी कायदे अमलात आणुन देशातील नागरिकांचे तोंड बंद करण्याच्या कार्य प्रणालीला सुरुवात करणे होय.

       अर्थात भाजपाद्वारे भारत देशात येनकेन प्रकारे मनुस्मृती कायद्यांतर्गत ब्राह्मणशाहीचे विषमतावादी मुळे परत देशात मजबूत करण्यासाठी सत्तेचा वारंवार दुरोपयोग करणे होय.

        भाजपा अंदाधुंद मुजोरी करते ते लाचार निवडणूक आयोगामुळे व ईव्हीएम मशीन द्वारा मत चोरीमुळे हे लपून राहिलेले नाही.

         म्हणूनच देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या मत चोरीच्या बाबतीत जे देशभरात जनआंदोलन सुरु केले आहे ते बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकींवर डोळा ठेवून आहे की,या देशाच्या सर्व सार्वत्रिक निवडणूकांमधून ईव्हीएम मशीनला हद्दपार करण्यासाठी?हा प्रश्न मला तरी पडला आहे.नव्हे तर हा प्रश्न मला सतावतो आहे.

        कारण ईव्हीएम मशीने या देशातील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यावर केव्हाचेच पाणी फेरले आहे आणि त्यांच्या मुलभूत व इतर प्रकारच्या अधिकारांवर गदा आणली आहे.देशातील नागरिकांना पंगू करण्याचे काम सुध्दा या ईव्हीएम मशीने केले आहे.

     तद्वतच बहुजन समाजातील राजकीय पक्षांना सुध्दा या ईव्हीएम मशीन ने गिळंकृत केले आहे.

           यामुळे ईव्हीएम मशीन द्वारा मत चोरीचा पुढे आलेला मुद्दा राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह इतर पक्ष तडीस नेणार काय? आणि देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे केंद्र सरकारला व केंद्रीय निवडणूक आयोगाला बैलेट पेपर द्वारे सार्वत्रिक निवडणूका नेहमी घेण्यास भाग पाडतील काय? हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो आहे.

      तरीही,”ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव,जनआंदोलनाची यशस्वी वाटचाल होईल असे गृहीत धरण्यास हरकत काय?

        पण,ईव्हीएम मशीन विरोधातील नेतृत्व हे,”अर्ध्या हरकंडात पिवळे होणारे नकोय,हेच भारत देशातील नागरिकांना अपेक्षित आहे.

      विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका बैलेट पेपरवर आणल्या तर ते लोकशाहीला तारणारे जननायक ठरतील,असे म्हणण्यास हरकत नाही…