Home Maharashtra चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मानवी मनाला चटके देणारे असंवेदनशील व्यक्तीत्व का?…. —...

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मानवी मनाला चटके देणारे असंवेदनशील व्यक्तीत्व का?…. — चिमूरला आले,”पण,जांभुळघाट पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळेला भेट दिलीच नाही.‌‌.. — आदिवासी विद्यार्थ्यांना समजतात तरी काय?

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

          आदिवासी समाजाचे विद्यार्थी मेले काय आणि जिवंत राहिले काय? याच्यासी चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.अशोक उईके यांना आणि स्थानिक आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना काहीच सोयरसुतक नाही असे त्यांच्या कार्यपध्दती वरुन लक्षात येते आहे.

       जांभुळघाट पोस्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळेचतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना त्यांची कृती कर्तव्यहिन दिसून आली व त्यांची असंवेदनशील संवेदना आदिवासी समाजातील नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनाला चटके लावून गेली.

       चिमूरला आलेले आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके १० किलोमीटर अंतरावर असलेल्या निवासी आश्रम शाळेला भेट देऊ शकले नाही?या त्यांच्या भुमीकेला व कृतीला काय म्हणावे?असा प्रश्न चंद्रपूर जिल्हातंर्गत समस्त नागरिकांना पडला आहे.

          जांभुळघाट येथील पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळेत एक दोन नव्हे तर शेकडो विद्यार्थ्यांना शिळ्या जेवणातून विषबाधा झाली होती.विद्यार्थांच्या विषबाधेचे गंभीर प्रकरण अगदी ताजे म्हणजेच १ आठवडा पुर्वीचे असताना चिमूर क्रांती दिनानिमित्त १६ आगष्टला शहिदांना अभिवादन करण्यासाठी चिमूर येथे आलेले चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री डॉ.अशोक उईके आणि स्थानिक आमदार किर्तीकुमार भांगडीया हे मौजा जांभुळघाट येथील पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळेला भेट देऊ शकले नाही,या त्यांच्या कर्तव्याला काय म्हणावे?

         वेळे अभावी जा़भुळघाट पोस्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळेला भेट देऊ शकलो नाही हे आदिवासी विकास मंत्र्यांचे कारण चंद्रपूर जिल्हातंर्गत नागरिकांना बिलकुलच न पटणारे असू शकेल…

         मंत्री महोदय,चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आदिवासी विकास मंत्री आहात याचे भान तुम्ही ठेवायला नको काय?हा प्रश्न आदिवासी नागरिकांचा आहे.

          आदिवासी विकास मंत्री महोदय,

१) जांभुळघाट पोस्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी फाटलेल्या गाद्या असताना तुम्हाला निवांत झोप लागतेच कशी?

२) पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसताना तुमची तहान शमतेच कशी?

३) विद्यार्थ्यांना शिळे अन्न दिले जात असताना तुमची संवेदना कशी काय मरतय?

४) विद्यार्थांचे वारंवार आरोग्य बिघडत असताना तुम्ही गाफील कसे काय आहात?

५) विद्यार्थ्यांना त्रास होत असताना तुम्ही कर्तव्यहिन कसे काय आहात?

६) त्यांची सर्व प्रकारची सुरक्षा ऐरणीवर असताना तुम्ही नकारात्मक कसे काय आहात?

     हेच आदिवासी समाज बांधवांना व निवासी विद्यार्थ्यांना कळेनासे झाले आहे..

            जांभुळघाट येथील निवासी विद्यार्थ्यांना सदृश्य व त्वचा संबंधात आजारांनी घेरले असल्याचे अनेक वर्तमानपत्रांतून समोर आले.हे प्रकरण सत्य आहे असे म्हटले तरी शिळ्या अन्नातून शोकडो विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेचे काय? त्यांना शिळ्या अन्नातून झालेल्या विषबाधामुळे अति प्रमाणात त्रास सहन करावा लागला याचे काय? विद्यार्थ्यांना झोपायला गाद्या नाहीत याचे काय? याला जबाबदार कोण?,”एटीसी नागपूर!,”आदिवासी एकात्मिक प्रकल्प विकास अधिकारी चिमूर!, की स्थानिक कर्मचारी जबाबदार?

        आमदार हे लोकहितासाठी संवेदनशील व्यक्तीमत्व असावे?केवळ भांडवलदार पध्दतीने काम करणारे नसावे,हेच जांभुळघाट येथील पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळेतील प्रकरण सांगून जातय.तरीही,आदिवासी विकास मंत्री हे संवेदनशील असायलाच पाहिजे!..

         चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके हे चिमूर विकास कृती आराखड्याला अनुसरून करोडो रुपये निधी मंजूर करणार असतील तर जांभुळघाट येथील पोस्ट बेसिक शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी गाद्या घ्यायला वेळेत रुपये का म्हणून देत नाही?

       तद्वतच जांभुळघाट निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना त्वचारोग आणि सदृश आजार वारंवार होत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी त्वरित घेणे संबंधाने सर्व उपाययोजना तातडीने अमलात आणणे मानविय दृष्टीकोनातून गरजेचे आहे.

        सदृश आजार व त्वचा रोग विद्यार्थ्यांना वारंवार होणे ही गंभीर बाब आहे.कारण त्वचा रोग हा आजच्या काळात खतरनाक रुप धारण करीत आहे.अनेक वर्षापर्यंत हा आजार बरा होत नसल्याचे अनेक प्रकरणे आहेत.

        तद्वतच हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे परस्पर जवळच्या विद्यार्थ्यांना सुध्दा त्वचा रोगाची लागण होऊ शकते? याकडे आदिवासी विकास मंत्री लक्ष देणार काय?

         आदिवासी समाज व आदिवासी समाजातील नागरिक आणि विद्यार्थी हे आता नेत्यांची व राजकारण्यांची परिभाषा ओळखू लागले आहेत.यामुळे नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी उर्मीत राहू नये असेच जांभुळघाट येथील पोस्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळातंर्गत विद्यार्थ्यांच्या समस्यांचे व घटनाक्रमाचे प्रकरण आहे.