Home देशविदेश नैतिकधर्म आणि देवधर्म…

नैतिकधर्म आणि देवधर्म…

         धर्म म्हणजे आचरण.धर्म म्हणजे कर्तव्य.कर्तव्य म्हणजे केलेच पाहिजे असे काम.म्हणजे टाळता येत नाही,असे काम, आणि जर ते काम टाळले तर त्याचे अनिष्ट परिणाम होतात,असे काम म्हणजे टाळता येत नाही,असे काम.म्हणजेच कर्तव्य होय.आणि कर्तव्य म्हणजेच धर्म होय.कर्म कार्य परिश्रम श्रम म्हणजे कर्तव्य नव्हे,तर कर्तव्ये म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे कर्तव्य.धर्माचा अर्थ कर्म नसून कर्तव्य हा आहे.की जे नाही केले तर जीवनाचे सार्थक होणार नाही,म्हणजे जीवनाला काही अर्थच राहणार नाही.ते निरर्थक आणि बेकार दिशाहीन भरकटलेले असेल.निरर्थक म्हणजे अर्थहीन असेल.

          अर्थपूर्ण जीवन याचा अर्थ शारीरिक सुख प्राप्ती आणि मानशिकसुख प्राप्ती. शरीरसुख आणि मानशिकसुख माणसाला मिळाले की माणसाला आनंद समाधान शांती मिळते.सुख शांती आनंद समाधान या साठीच माणसाची धडपड असते.या गोष्टी मिळाल्या की माणूस संतुष्ट होतो.त्याला चरनसीमा म्हणजे जीवनाचे अंतिम ध्येय सापडले असे वाटते.हेच अंतिम सत्य आहे,असे मानव समजतो.

        अर्थात शारीरिक सुख हे भौतिक सुविधांमुळे मिळते आणि मानसिक ( कुणी यास आत्मिक पण म्हणतात. ) सुख म्हणजे मन आणि बुद्धीचे सुख हे जनसेवेतून मिळते.यास कुणी परमार्थ पण म्हणतात.स्वार्थ आणि परमार्थ असे दोन अर्थ असून या दोन अर्थाचे दोन कर्म आहेत,स्वार्थीकर्म म्हणजे स्वतःसाठी केलेले आणि निस्वार्थी म्हणजे कसल्याही अपेक्षा न ठेवताता निस्पृह पारदर्शी कार्य इतरांसाठी केलेले कर्म म्हणजे जनसेवा किंवा परमार्थ होय.स्वार्थी कार्यातून भौतिकसुख ( अन्न वस्त्र बंगला गाडी,बँकबॉलन्स,सोने हिरे ही संपती ) मिळते.पण मानसिक सुख मिळत नाही,यासाठी इतरांसाठी काही करावे लागते.नव्हे ते माणूस म्हणून आपले कर्तव्यच आहे.जे आपण भुलले आहे. माणूस म्हणजे जनावर नव्हे,ज्याला फक्त स्वतःपुरतेच विचार सुचतात.जो स्वार्थी आहे,आणि स्वार्थासाठी तो हिंसा पण करतो.

        माणसाला स्वतःच्या पलीकडचा विचार करण्याची बुद्धी ,आणि इतरांसाठी कर्म करण्याची ताकद क्षमता चातुर्य पण आहे.निसर्गाने ही बुद्धी दिली,पण माणूस जेव्हा फक्त स्वतःचेच कर्तव्य करतो इतरांचे बद्दलचे कर्तव्य तो विसरतो,एव्हढेच काय जन्म दिलेल्या आईवडिलांचे बद्दलचे आपले कर्तव्य विसरतो,म्हणूनच तो जनावर बनतो,माणूस ना उरतो.खरे तर कर्तव्यानेच माणूस घडतो,कर्तव्य ( केलेच पाहिजे असे कर्म ) पालन नाही केले तर तो माणूस ना उरतो,म्हणजेच तो माणूस नसून जनावरच होय.

        त्यात अजूनही उत्क्रांती बदल झाला नाही, त्यावर मानवी संस्कार झाले नाहीत,म्हणूनच त्यातील स्वार्थाच्या मर्यादा त्याने ओलांडल्या नाहीत. तो अजूनही स्वार्थाच्या कोशातच फुलपाखरासारखा बंदिस्त आहे.संकुचित आहे.आपला संसार म्हणजेच बेडकाची विहिरी हे बेडकाचे विश्व असते तसे यास वाटायला लागते.स्वतःतच गुरफटून असतो.जगातील आपल्या देशातील आपल्या सभोवताल असणाऱ्या माणसाच्या समस्या काय आहेत ,, ? त्या का आहेत ? त्यावर उपाय काय ,? या बद्दल अशा संकुचित स्वार्थी माणसाला या प्रश्नाशी काहीच देणे घेणे नसते.

        माणूस गरीब असो की श्रीमंत, तो कोणत्याही जातीचा असो की धर्माचा ,सारीच माणसे नैतिक कर्म करणे ऐवजी धार्मिक कर्मच करताना दिसतात.धार्मिक कर्म म्हणजे ईश्वर आराधना आणि कर्मकांड .यातून नैतिकता विकसित होत नाही,उलट अनैतिक जीवनाला देव आणि धर्माचा सपोर्ट मिळतो.

        कारण स्वार्थी दुष्ट कपटी पाताळयंत्री षडयंत्री माणसे देव धर्माच्या आडून सर्वसामान्याची आर्थिक लूट करतात,त्यांना काल्पनिक जगात वावरायला लागतात.वास्तव जीवन या वास्तव जीवनातील दुःख दारिद्रय आदन्यान हे देवाची अवकृपा आणि दैवाचा ,पूर्वीच्या जन्माचे पाप असे खोटे कारण सांगून यातून मुक्ती मिळवण्यासाठी देव धर्माचे कर्मकांडाचे नादी लाऊन स्वतःची सत्ता संपती प्रतिष्ठा कायम राखण्याचे हे स्वार्थी लोक हे काम करतात.

          देवाचे धर्माचे आचरण म्हणजेच कर्मकांड ,कर्मकांड म्हणजेच पुण्यकर्म.पुण्यकर्म म्हणजेच मोक्ष.असे खोटे शिक्षण दिल्या जाते.या शिक्षणात नैतिकतेचे शिक्षण नसते.स्वार्थासाठीच पुण्य,नवस सायास,तीर्थाटन,पूजाअर्चा,अनुष्ठान असते.लोकांसाठी ते नसते.म्हणून धर्मकांड म्हणजे नैतिकता नव्हे.नैतिकता म्हणजेच धर्म होय.कारण कर्तव्य म्हणजेच धर्म होय.आणि संसार करून परमार्थ साधणे हेच नैतिक कर्म होय.

        इतरांचे शोषण केल्याशिवाय ,इतरांच्या श्रमाची चोरी केल्याशिवाय,श्रमिकांना कमीत कमी पगारात जास्तीत जास्त तास काम करून घेतल्याशिवाय म्हणजेच त्यांचे शोषण केल्याशिवाय कुणीही श्रीमंत होत नाही.आणि शोषण पिळवणूक मग ते आर्थिक असेल की सामाजिक ,केल्याशिवाय माणूस श्रीमंत होऊच शकत नाही.कष्टकरी कामगार शेतकरी श्रीमंत होत नाहीत,उलट दरिद्री होतात,अहोरात्र मेहनत करून,घाम गाळूनही ते श्रीमंत का होत नाहीत ? विद्यार्थी,महिला,बेकार तरुण,शेतकरी , कामगार या कष्टकरी श्रमिक वर्गातच आत्महत्या का होतात ? यांच्यावरच अन्याय अत्याचार का होतात? याचे कारण देवाच्या आणि धर्माच्या नावावर यांचे शोषण केल्या जाते.यांना आपल्या खडतर जीवनाचे कारण त्यांनी शोधू नये,म्हणून या देवाधर्माच्या कर्मकांडात गुंतून ठेवण्यात येते.एव्हढे की,त्याला स्वतःच्या खडतर जीवनाबद्दल विचार करण्यास वेळच मिळू नये.असे हे षडयंत्र आहे.हे षडयंत्र म्हणजेच मोठे पाप आहे.हे अनैतिक आहे.

       नैतिक कर्म म्हणजे प्रेम सहकार्य,बंधुभाव ,स्वातंत्र्य,समता,सत्य न्याय निती,दया क्षमा शांती.इतरांना आपल्या मूळ कुणास ही दुःख होईल असे वागू नये.बोलू नये,कृती करू नये.आणि आपण अन्याय सहन करू नये,त्याचा प्रतिकार करावा,हीच नैतिकता होय,अशी आपली वर्तणूक म्हणजेच नैतिकता होय.जगातील दुःखी कष्टी,यांची वेदना दूर होण्यासाठी केलेले विचार आणि कार्य म्हणजेच नैतिक कार्य होय.

         देव धर्माचे कार्यामुळे माणूस नैतिक होतोच याची खात्री नाही.उलट त्यात तो गुरफटून बसतो निती आणि अनीती म्हणजे काय ? यावर विचार करण्याची त्याची शक्ती पण क्षीण होते.कारण देव धर्म करणारा माणूस भक्त बनतो,भक्त म्हणजे श्रद्धा विश्वास पूर्णतः देवावरच भरवसा.यामुळे तो परावलंबी बनतो.देव आणि भक्तात मध्यस्थ म्हणून गुरू असतो.गुरु शिवाय भक्ताला देवाचा मार्ग दिसत नाही.देवाचा मार्ग फक्त गुरुलाच माहीत असतो.त्याच्या शिवाय भक्ताला मार्ग सापडूच शकत नाही.या विचारावर भक्ताची श्रद्धा बसते.म्हणून तो आपली बुद्धी गुरूच्या ताब्यात देतो.किंवा आपल्या बुद्धीच्या चाव्या गुरूच्या स्वाधीन करतो.आणि आपल्या बुद्धीला कुलूप घालतो.आणि इथेच भक्त फसतो.आणि सारे आयुष्य दुःखात आणि त्रासात व्यतीत करीत असतो. आपले त्रासदायी आयुष्य देवावर विश्वास ठेवल्याने आणि धर्माचे आचरण केल्याने संपेल या विश्वासाने शेवटी मरून च जातो,पण त्याला आपल्या दुःख दारिद्र्याचे कारण सापडताच नाही.कारण ते शोधण्याची त्याची शक्ती क्षीण झालेली असते.खरे तर माणसांच्या जीवनात असे घडणे म्हणजेच अनैतिकता होय. 

        शोषण करणे,अन्याय अत्याचार करणे,इतरांची देव धर्माच्या नावाने फसवणूक करणे,चोरी मारामारी,खून खराबी ,षडयंत्र करून संपती मिळविणे,भ्रष्टाचार करणे,महागाई वाढविणे,बेकारी वाढविणे,काळाबाजार,साठेबाजी,तरुणांना व्यसनाच्या नादी लावणे, नशिले पदार्थांचे उत्पादन विक्री करणे,इतरांचे संसार उध्वस्त करून स्वतःचा संसार थाटणे,अवैध वाहतूक,धंदे यांना मदत करणे हे सारे अनैतिक कार्य होय.हेच सामाजिक पाप होय.हे सारे सरकार स्वतः करते,आणि जनतेला करावयास भाग पाडते.हे पाप लपविण्यासाठी सरकार आणि श्रीमंत लोक देव धर्माचे अवडंबर माजवतात.हे एक अजून पाप करतात.पाप म्हणजेच अनैतिक वर्तणूक होय.पुण्य म्हणजेच नैतिक वर्तणूक होय.देव धर्म कार्यातून पुण्य होत नाही ,तर जनसेवेतून,जनतेच्या जाणिवा,क्षमता,कौशल्य विकसित केल्यामुळे पुण्य मिळते.असे कार्य करणे म्हणजेच नैतिककार्य आणि नैतिकता होय.

       लेखक : दत्ता तुमवाड.

          सत्यशोधक समाज नांदेड.

       दिनांक: 16 ऑगस्ट 2025. फोन: 9420912209.