Home Maharashtra महाराष्ट्र राज्यातील सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्यावे:- विजय वडेट्टीवार लोकलेखा समिती अध्यक्ष...

महाराष्ट्र राज्यातील सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्यावे:- विजय वडेट्टीवार लोकलेखा समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

      राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या व्हीव्हीपॅटवर घेता येणार नाही अशी भूमिका घेतली आहे.परंतु यापूर्वी मतांची चोरी झाल्याचे प्रचंड गंभीर स्वरूपाचे आरोप विविध राज्यांतील राजकीय पक्षांकडून वारंवार निवडणूक आयोगावर झाले आहेत. 

     अशातच पुन्हा व्हीव्हीपॅटचा वापर करणार नाही अशी निवडणूक आयोगाने आपली भूमिका जाहीर केल्यामुळे राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपांची पुष्टी होते. 

      एका प्रभागात चार मतदान असल्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यास वेळ जाणार असे निवडणूक आयोगाचे मत आहे.

      त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि लोकांचा संभ्रम दूर करावा अशी आमची भूमिका आहे.

      म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ग्रामपंचायत,जिल्हापरिषद,नगरपरिषद,महानगरपालिका या सर्व निवडणुका व्हीव्हीपॅट सह किंवा बॅलेट पेपरवर घ्याव्यात,जेणेकरून लोकांना आपल्या पारदर्शकतेवर विश्वास बसेल आणि निवडणुका सुरळीत पार पाडता येतील अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाने केली आहे.