कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पेंच जलाशयाच्या डाव्या कालव्यात काल दुपारी २ वाजताच्या सुमारास एक महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलासह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली.
मात्र,मायलेकाच्या आत्महत्याचे रहस्य काय?या अनुषंगाने जनमानसात चर्चा सुरु आहे.
पेंच जलाशयाच्या डावा कालवा,जो भंडाऱ्याकडे वाहत जातो,तो आपल्या पूर्ण क्षमतेने वाहत आहे.याच डाव्या कालव्यात काल दुपारच्या वेळेला एक महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलाला कमरेला बाधुन कालव्यात उड़ी मारून वाहून गेल्याची घटना काल दिनांक 12 ऑगस्ट ला दुपारी दोन ते तीनच्या सुमारास घडली.
मुलासह वाहून गेलेली महिला जवळील पटगोवारी येथील रहिवाशी असून सौ.अल्का शेखर बेहुने वय 28 वर्ष असे तिचे नाव आहे.
सदर घटनेची सूचना पारशिवनी पोलिसांना मिळताच ठाणेदार राजेश कुमार थोरात व पृथ्वीराज चव्हाण,पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून वाहून गेलेल्या महिलेच्या मुलांचा व महिलेचा शोध घेत होते.
मात्र,तिच्या मृत्यूचे रहस्य काय?हे पोलिस तपासात निष्पन्न होईल.



