दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४,हा काळा कायदा असून महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांच्या महत्वपूर्ण अधिकारांना नाकारणारा आहे व लोकशाही सह नागरिकांचे दमन करणारा आहे.यामुळे या कायद्याच्या विरोधात जनआंदोलन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांनी केले.
नवभारत विद्यालय मुल येथे जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीची बैठक काल संपन्न झाली.या सभेला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या,”या काळ्या कायद्याचा,विरोध करण्यासाठी मूल शहरात कृती समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.
संविधान विरोधी म्हणजे सर्व नागरिक विरोधी कायदा रद्द करण्याच्या दृष्टीने राज्यभरामध्ये एक मोठे आंदोलन निर्माण करण्यात येत आहे.याची धग मूल तालुक्यात पोहोचली आणि या कायद्याच्या विरोधात जनआंदोलन करण्यासाठी जनसुरक्षा विरोधी कृती समिती कालच्या बैठकीत तयार करण्यात आली.
या कायद्यान्वये मुलभूत,धार्मिक,तथा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे.
याचबरोबर संघटन बनवण्याचा,आपल्या अधिकारासाठी,आपल्या शिक्षणासाठी,आपल्या रोजगारासाठी,आपल्या शेतीविषयक हक्कांसाठी,महिलांच्या अधिकार रक्षणासाठी धरणे देणे,आंदोलन करणे,मोर्चा काढणे तर दूरच एकूणच सर्व नागरिकांच्या (महिला/षुरुष) सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याला पूर्णपणे नकारणारे हे विधेयक रद्द
करण्यासाठी सर्व पुरोगामी संघटना एकवटल्या पाहिजेत यावर सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ च्या विरोधात आंदोलन उभे करण्याच्या दृष्टीने मुल मधील सर्व पुरोगामी संघटनांनी सभातंर्गत मार्गदर्शन शिबीर घेण्याचे ठरलेले होते.
सर्व संविधान प्रेमी,अधिकार प्रेमी व जागरूक नागरिकांची सभा स्थानिक नवभारत विद्यालयात दि.१० आगस्ट ला दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली होती.
या सभेसाठी सर्व समाज घटकांतील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक विरोधक कृती समितीचे आयोजन डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी केले होते.
या सभेत आंदोलनाची दिशा ठरली असून मान्यवरांचे योग्य मार्गदर्शन विविध सामाजिक व राजकीय स्तरांवरील पदाधिकाऱ्यांना लाभले.



