Home Maharashtra गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले…

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :– गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद जी सावंत यांनी आज आळंदी नगरीला सदीच्छा भेट देऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केला. समाधी मंदिरातील दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरात फिरून ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे पाहिली.

        याप्रसंगी आळंदी देवस्थान तसेच स्थानिक मान्यवरांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून यथोचित सन्मान केला. फुलांचा हार, शाल, श्रीफळ देऊन मुख्यमंत्री सावंत यांना सत्कार करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, भाजप नेते संजय घुंडरे, ॲड.आकाश जोशी, संकेत वाघमारे, शंतनू पोफळे यावेळी उपस्थित होते. माऊलींच्या दर्शनानंतर त्यांनी मंदिरात प्रसाद भोजनाचा आस्वाद घेतला.

          मुख्यमंत्री सावंत यांनी आळंदी नगरीचे अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्थानिकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच वारकरी संप्रदायाचे कार्य आणि समाजातील एकात्मतेच्या भावनेचे महत्त्व अधोरेखित केले. दर्शन व सत्कार सोहळ्यानंतर मुख्यमंत्री सावंत पुण्याकडे रवाना झाले.