आज मला माझ्या बहिणीने राखी बांधली,म्हणून ” राखी ” या विषयाबद्दल मी विचार केला त्यातून जे सुचलं ते इथे मांडीत आहे.
राखीचा इतिहास किंवा कारणाचा शोध घेतला तर असे दिसते की,स्त्रिया या पुरुषापेक्षा दुर्बल आहेत,म्हणजेच पुरुष सबल आहेत,म्हणून दुर्बलानी सबला चे संरक्षण घ्यावे,किंवा घ्यावे लागते,जिवंत राहण्यासाठी,शिवाय पुरुष सबल असून स्त्रिया दुर्बल आहेत.म्हणून स्त्रीपुरूष समान नाहीत.बुद्धीने आणि शारीरिक बलाने पण स्त्रिया कमकुवत आहेत,असे शिक्षण ” मनुस्मृती ” ने दिले.आणि कायदा पण केला की स्त्रीने मर्दुमुखीचे कामे करू नये.शौर्य धैर्याची कामे,रणांगणाची कामे फक्त पुरुषांनी करावे,लढाईची कामे स्त्रियांनी करू नये,कारण स्त्री जात ही बुद्धीने ताकदीने कमकुवत असते,दुर्बल असते.म्हणून तिने फक्त चूल मुल आणि घरकाम आणि मजुरीचे आणि साफसफाईचेच काम करावे,अस्पृश्य समाजा सारखे घरातील घाणीचे काम फक्त स्त्रियांनी करावे,शिवाय तिला मासिकपाळी मुळे रक्ताची हानी होऊन ती दुर्बळ बनते,शिवाय मासिक पाळी म्हणजे घाण.म्हणजेच स्त्री ही घाणीची वस्तू,म्हणून ती अस्पृश्य .म्हणून मनुस्मृतीत तिचा दर्जा ” अस्पृश्य ” समाज म्हणूनच राहिला.स्त्रीला अक्कल नसते,स्त्रीचे शहाणपण फक्त चुलीपुरते,अशा म्हणी पण रूढ केल्या.मनूच्या या असा स्त्रीपुरुषांमध्ये भेदभाव करणाऱ्या कायद्यामुळे आणि वैदिकधर्माच्या प्रचारामुळे, पोथी पुराण,कथा कीर्तन यांच्या शिक्षणामुळे स्त्रीची मानसिकता पण ” खरच आपण दुर्बळ आहोत आणि पुरुष सबल आहे,साऱ्या क्षमता आणि कौशल्य हे पुरुषाकडेच असतात.अक्कल नावाची चिज आपणाकडे नसते,ती पुरुषाकडेच असते ” अशी मानसिकता महिलांची बनली.पुरुषांची पण अशीच मानसिकता झाली.या चुकीच्या कायद्यामुळे आणि शिक्षणामुळे स्त्रीला स्वतःला कुठेतरी असुरक्षितता वाटायला लागली,म्हणून आपणास पुरुषांचे संरक्षण घेणे जरुरीचे आहे,असे वाटायला लागले,खरे तर भाऊ आणि बहीण एकाच आईच्या उदरातून जन्म घेतलेले असतात,त्यामुळे त्या दोघांचेही कर्तव्य ठरते की,आपण प्रत्येक बाबतीत एकमेकांची साथ दिली पाहिजे म्हणून.तरी पण सख्या भावाबद्दल पण कदाचित तिला खात्री नसावी म्हणून किंवा त्याला जाणीव करून द्यावे म्हणून किंवा त्याला आपल्या संरक्षणाचे बंधन टाकावे,बांधावे म्हणून दरवर्षी या महिन्यातील पौर्णिमेला बहिणीने भावाला राखी बांधून भावाकडे ” याचना करायची ,किंवा त्यास सांगायचे की,” भाऊ तू पुरुष आहेस म्हणून तू सबळ आणि बुद्धिमान आहेस,आणि मी स्त्री आहे,म्हणून मी निर्बुद्ध आणि दुर्बल अबला आहे,तू मी एकाच आईच्या उदरी जन्म घेतला,याची जाणीव ठेऊन सदासर्वदा भाऊ तू माझे संरक्षण करण्यास तत्पर असावे,यासाठीचे हे रक्षणाचे बंधन मी तुझ्या मनगटावर बांधीत आहे.( मनगटावरच राखी का तर मनगटात तलवार पेलण्याची ताकद असते म्हणून ). अशी आठवण करून देण्यासाठी ही राखी बांधण्याची प्रथा निर्माण झाली,किंवा स्त्रीने आपण दुर्बळ आहोत ,याचा विसर पडू नये,म्हणून तिने दरवर्षी राखी बांधायची असते.अशी या राखी बांधण्या मागचा विचार आहे,जो विचार स्त्रीपुरूष समानता चे विरुद्ध आहे.स्त्रीपुरुषात भेद करणारा आहे.
खरे तर या राखीला रक्षाबंधन म्हणणे ऐवजी प्रेम बंधन ,म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमाचे अतुट नात्याची जाणीव करून देणारी ही प्रेमराखी आहे,असे शिक्षण द्यायला हवे होते,पण ते विषमतावादी तत्वात बसत नाही.म्हणून मनू वादी विचारांच्या कुबुद्दीवाल्यांना ” रक्षा बंधन ” हेच नाव महत्त्वाचे आणि आवश्यक वाटले असावे.कारण स्त्रीला स्वावलंबी बनवायचे नव्हते,तर परावलंबी ठेवायचे होते.स्त्री ही माणूस नव्हे तर एक साधन आहे,उपभोगाचे आणि सौंदर्याचे.पुरुष वर्गासाठी.असा त्यामागचा विचार आहे.हा विचार विषमतेचा तर आहेच पण अन्यायकारक आहे.बंधनकारक आहे.
या बंधनातून स्त्रीला मुक्त करण्यासाठी,समतावादी परंपरा आणि विचारसरणीचे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेच्या कायद्याचे संविधान लिहून त्यात हिंदूकोडबिल समाविष्ट केले.सुरुवातीला स्त्रीच्या स्वातंत्र्याचे स्वावलंबनाचे स्त्रीपुरूष समतेचे हे हिंदूकोडबिल संविधान सभेत मंजूर झाले नाही,परंपरावादी विषमतावादी जुन्या विचारांच्या अंधश्रद्धा बाळगणाऱ्या पुरुषांनीच नव्हे स्त्रियांनी पण विरोध केला,बहुमतांनी हे हिंदूकोडबिल फेटाळले,म्हणून बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला,बाबासाहेबांच्या या नाराजीमुळे पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांनी एक एक करून नंतरच्या काही संसदसभेतून हे हिंदूकोडबिल मंजूर करून घेतले.
स्त्रीमुक्तीचा हा इतिहास जर समजून घेतला तर वाचकाना नक्कीच असे म्हणावे लागेल की,परावलंबी असलेल्या स्त्रीला स्वावलंबी बनवण्यासाठी,पारतंत्र्यात असलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी सतीची चाल बंद करण्याचा कायदा,स्त्रीला मारहाण करणाऱ्या नवऱ्यापासून फारकत घेण्याचा कायदा, सातजन्माची गाठ म्हणजे बंधन तोडणारा कायदा,नवऱ्याने सोडले तर तिला बापाच्या प्रॉपर्टीत हिस्सा देणारा कायदा,सरकारी किंवा खाजगी नोकरी करणारा कायदा,बाळंत रजा,सुट्ट्या,घटस्फोटीत स्त्रियांना पोटगी मिळण्याचा कायदा,असे कितीतरी कायदे हिंदुस्त्रीयासाठी हे बील आणून बाबासाहेबांनी स्त्रियांना मुक्ती दिली.आणि पुरुषापेक्षा स्त्री कोणत्याही क्षेत्रात सरस आहे,हे विचार मांडले,स्त्रीला सैन्यात पोलिस भरती मध्ये पण समाविष्ट केले.आणि स्त्री ही दुर्बल नसून ती स्वतःचे स्वतः पण संरक्षण करण्याची तिची क्षमता आहे,एव्हढेच नव्हे तर ती पोलिस होऊन जनतेचे संरक्षण करू शकते,ती निर्बुद्ध नाही, ती कलेक्टर पण होऊ शकते,देशाच्या सीमेवर हातात बंदूक घेऊन लढाईपण करू शकते,एव्हढेच नाही तर स्त्रीला समानतेचा हक्क आणि संधी दिली आणि स्वातंत्र्य दिले तर ती राष्ट्रपती पण होऊ शकते आणि प्रधानमंत्री होऊन देशाचा पण कारभार करू शकते,हे बाबासाहेबांना कळले होते,म्हणून त्यांनी स्त्रीची मनूच्या कायद्याच्या बंधनातून मुक्तता करून भारतीय संविधानाच्या कायद्याने संरक्षण दिले.म्हणजेच हिंदूकोडबिल नावाची राखी बाबासाहेबांनी केवळ लाडक्याचं नव्हे तर तमाम बहिणींच्या मनगटावर बांधली,आणि ही संरक्षणाची राखी म्हणजेच स्वसंरक्षण आणि स्वावलंबन आणि स्वातंत्र्याची राखी म्हणजेच बंधनाचा धागा बाबासाहेबांनी बांधला.बाबासाहेब हे तमाम भारतीय बहिणींचे मुक्तिदाता भाऊ सिद्ध झाले.खरे तर स्त्रिजातीने बाबासाहेबांचे हे उपकार सात जन्मीच नव्हे तर जन्मोजन्मी विसरू नये.म्हणून प्रत्येक राखी पौर्णिमेला प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधताना बाबासाहेबांची ही आठवण जागृत केली पाहिजे,असे करणे म्हणजे त्यांना आदरांजली ठरेल.



