Home Maharashtra शंकरपुरच्या विजयाची शिल्पकार, रणरागिणी “शेजल” चा सत्कार…  — ग्रामपातळीवर भव्य सत्काराने...

शंकरपुरच्या विजयाची शिल्पकार, रणरागिणी “शेजल” चा सत्कार…  — ग्रामपातळीवर भव्य सत्काराने सन्मानित होणारी ठरली पहिली आदिवासी तरुणी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : तालुक्यातील शंकरपुर येथे नुकताच अंगणवाडी मदतनीस पदभरतीचा गैरकारभार हा अन्य विषयांपेक्षा वेगळा व गंभीर स्वरूपाचा होता व याच घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविण्याचा विडा येथील २४ वर्षीय आदिवासी तरुणी शेजल सयामने उचलला. आणि या लढ्यात ती विजयाची शिल्पकार ठरली. या जांबाज आदिवासी मुलीचा सत्कार तीच्या गावी जाऊन ( रविवार ०३ ऑगस्ट ) ला साकोली शहरातील व्हीआयपी, फ्रिडम व साकोली मिडीयातर्फे करण्यात आला. 

            शेजल सयाम म्हणजे स्वतः गावात घरोघरी जाऊन आपल्यावर अन्याय होतोय, आपल्याला आवाज उठवायला हवा, असे महत्व गावकऱ्यांना पटवून देत तिने गावकऱ्यांना एकत्रित गोळा केले व अन्यायाविरोधात गावकऱ्यांसोबत रणशिंग फुंकले. दरम्यानच्या काळात तिच्यावर अनेक संकटे आली तरी देखील अश्या आव्हाहांना तोंड देत खचून न जाता, तब्बल पाच महिने या अन्यायाविरुद्ध अहोरात्र लढा दिला व संघर्ष सुरुच ठेवला. व अखेर विजयाचा दिवस उगवला. जिल्हा पातळीवरून शेजल सयामच्या बाजूने निकाल लागला व गावकऱ्यांच्या लढ्याला यश मिळाले व जणू शंकरपुरात इतिहासच घडला. गावात चहूकडे आनंदाचा सागर पसरला. गावकऱ्यांनी विजयाचा गुलाल उधळीत, फटाके वाजवून आतिषबाजी केली व थेट नागपंचमीच्या सणाला “दसरा-दिवाळी” साजरी केली होती. 

            या लढवय्या आदिवासी तरूणीचा शाल श्रीफळ देत सत्कार तीच्या शंकरपुर गावी जाऊन करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सत्कार कार्यक्रमाला व्हीआयपी ग्रुपचे अनिल कापगते, सामाजिक कार्यकर्ता महेश पोगळे, फ्रिडम युथ फाऊंडेशनचे किशोर बावणे, साकोली मिडीयाचे आशिष चेडगे, पत्रकार मनिषा काशिवार, ऋग्वेद येवले, शिक्षक हरिशचंद्र सोनवाने, रणवीर कापगते, हेमराज ठाकरे यांसह शेजल सयामचे कुटूंबीय उषा सयाम, शिशु वाढवे, कविता सयाम, रामेश्वरी वाढवे, ग्रामस्थ सचिन सोनवाने, रामकृष्ण वाढवे, दक्ष शेंदरे आदी उपस्थित होते.