प्रदीप रामटेके
मुख्य संपादक…
गरीबी अंतर्गत खाचखडगातील आयुष्य हे खडतर असतय आणि प्रसंगी कठीण,टोकदार,संवेदनशील, बोलकं,समजून घेणार असतय…
भारत देशात गरीब व समस्याग्रस्त व्यक्तींचे आयुष्य पावलोपावली टिपता येतय.मात्र त्यांच्या दारिद्र्याच्या सिमा मोजता येत नाही आणि त्यांच्या उत्तम भावनाही प्रसंगानुरूप समजून घेता येत नाही.
दारिद्र्य हे प्रसंगानुरूप आपल रुप धारण करत असतय.या दारिद्र्यात गर्भ श्रिमंत,सर्वसाधारण श्रिमंत,सामान्य नागरिक,गरीब नागरिक व दारिद्र्य नागरिक यांचा समावेश असतोच..
परिस्थिती अनुकूल असते तेव्हा दारिद्र्याच्या झडा कुणालाच समजत नाही.नव्हे तर दारिद्र्य म्हणजे काय हे कळत नाही.
“दारिद्र्य म्हणजे मनुष्याच्या आवाक्याबाहेर गेलेली आर्थिक परिस्थिती होय!,ज्या परिस्थितीत आरोग्याची,शिक्षणाची,जबाबदारीची समस्या उग्र रूप धारण करतय.याचबरोबर जिवनावश्यक समस्यांचा डोंगर आवासून पुढे उभा ठाकतोय..
भारत देशात गरिबांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे,ज्यांच्याकडे आर्थिक धन जमा राहात नाही आणि आर्थिक धन जमा ठेवण्यासाठी पुरेसे काम आणि आवश्यक संस्कार त्यांना मिळत नाही.
मात्र काहींना योग्य ज्ञान व उत्तम संस्कार कुठल्याही परिस्थिती अंतर्गत मिळत असतय.तद्वतच योग्य ज्ञान संपादन करण्यासाठी आणि उत्तम संस्कार रुजविण्यासाठी बरेच नागरिक,विद्यार्थी,सदैव तत्परही असतात.
ज्यांच्या मनात सस्नेहभाव,सस्नेह मैत्रीभाव,सस्नेह उन्नत भाव,सस्नेह न्याय भाव,सस्नेह बंधुत्व भाव,सस्नेह स्वातंत्र्य भाव,सस्नेह समता व समानता भाव,सस्नेह हक्क भाव,सस्नेह अभिव्यक्ती भाव,सस्नेह निरपेक्ष भाव,सस्नेह शिलभाव रुजतोय किंवा रुजलेला असतोय असे लोक मनातून खूपच निष्पक्ष प्रेमळ असतात आणि सहहृदय मदतगार असतात.
एकमेकांना समजून घेण्याची क्षमता अशा गुणधर्मांच्या पुरुष व महिलांमध्ये उपजत असते हे आकालनकर्त्यांंना माहिती आहे.
जे लोक इमानदारीने लोकहितासाठी विविध प्रकारचे ध्येयनिष्ठ कार्य करतात,ज्यांना समाजसेवेची-समाजसुधारणेची ओढ आहे.मग ते समाजसुधारक असोत,समाजसेवक असोत,राजकारण सुधारक असोत,राजकारणात परिवर्तन करणारे असोत,पत्रकार असोत,अशांना बऱ्याच अळचणींना वेळोवेळी सामोरे जावे लागतय.
हेच लोक समाजाला व समाजमनाला नेहमी जिवंत ठेवतात व त्यांचा आधार आणि आवाज असतात.पण,अशा लोकांवर आरोग्य व इतर प्रकारची आपत्ती आली तर त्यांना समजून घेणारा समाज व समाजमन हे दुबळे पडतय आणि शंकाकुशंका अंतर्गत स्वतःला अकारण दुर करतय हे एक वास्तव आहे..(अपवादात्मक घडामोडी सोडून किंवा बडे नेते व समाजसुधारक सोडून..)
न्याय,हक्क,बंधुता, स्वातंत्र्य,समता आणि समानता अंतर्गत लोकहितासाठी कार्य व संघर्ष करणारे,संवेदनशिल आणि संवेदनक्षम असणारे अनेक व्यक्तीमत्व हे तर आपल्या आयुष्यात स्वतःच्या भौतिक गरजांना व त्यातंर्गत अपेक्षांना महत्व देत नाहीत.त्यांच्यासाठी सर्व लोक समान असतात व त्यांच्या जवळचे असतात.त्यांच्या सुखसोयींसाठी,त्यांच्या हक्कांसाठी,त्यांच्या सुरक्षांसाठी ते नेहमी धडपडतात,नेहमी संघर्ष करतात,नेहमी तत्पर व जागरुक असतात…
असे असताना अशा तत्पर, संवेदनशील व जागरुक लोकांना जवळेचे व विश्वासू,फारच कमी लोक मानतात.
लोक हितासाठी वेगवेगळ्या कार्यातंर्गत व कर्तव्यातंर्गत संघर्ष करणारे जबाबदार लोक क्वचित बिकट समस्यांना अनुसरून विश्वासू किंवा जवळच्यांना आर्थिक मदत मागतात.त्यांना कधी आर्थिक मिळते तर कधी मिळत नाही.पण,ते कुणाचाही तिरस्कार करीत नाही किंवा विचारातंर्गत मन व मत भिन्नता अन्वये कुणाचाही द्वेष करीत नाही.
मात्र,अत्यंत निकडीचे विश्वासू मित्र व विश्वासू नातेवाईक निसंदेह सर्व प्रकारच्या कठीण काळात वारंवार मदत करतात व धिर देतात आणि उत्तम कार्य करण्यासाठी त्याला आधार देतात हे एक कटू सत्य आहे.
विश्वासू म्हणजे काय तर भयंकर विपरीत व कठीणातल्या कठीण काळात आपल्या मित्रांना व नातेवाईकांना प्रसंगानुरूप आवश्यक सहकार्य करणे व साथ देणे होय,सांभाळणे होय,सावरणे होय,आणि उत्तम कार्याला व कर्तव्याला परत वेग देणे होय.यालाच म्हणतात योग्य कृती व योग्य विचारातंर्गत एक आहोत,एक शक्ती आहोत..
यासाठी सहवास हवा सद्वविचारांचा आणि त्यातंर्गत सस्नेह मित्रांचा!असे मित्र व नातेवाईक अनमोल असतात आणि त्यांचे विचार सुध्दा सद्विचार असतात,अमुल्य असतात.
ज्यांच मन मोठ आहे,ज्यांची भावना चांगली आहे ते उत्तम मित्र असतात,उत्तम नातेवाईक असतात.ते अमुल्य व अनमोल मित्रांना व नातेवाईकांना जपण्यासाठी संकुचित विचारातंर्गत पळवाट काढणाऱ्या भावनांचे दर्शन घडवत नाही.
“कारण ते स्वतःच व्यक्तीश: अनमोल असतात,कुशल असतात,समजदार असतात…



