माणसाचे रक्त शोषून घेणारे मच्छर आणि ढेकूण हे दोन किडे फारच उपद्रवी आहेत.रात्रभभर शांत झोपू देत नाहीत.
फारच सतावतात झोप नीट न झाल्याने आणि रक्त शोसल्याने माणसे बिमार पडतात.मरावे म्हंटलेतर सापडत नाहीत,एखादे दोन सापडतात.बाकीचे तसेच राहतात.यांचा खातमाच करायचे झाल्यास औषध फवारणीची मोठी मोहीमच हाती घ्यावी लागते, तीही सरकारी पातळीवर,तेंव्हाच कूठे हे नामशेष होतात.खरे तर माणसांच्या म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत यांची ताकद फारच कमी असते,परंतु जो पर्यंत माणसाने यांना मारण्याची मोहीम हाती घेतली नाही,तोपर्यंत हे रक्तपिपासू शोषक नष्ट होत नाहीत.
अगदी असेच मनुवादी हे बहुजनांचे सामाजिक शोषण करीत आहेत,आणि पूंजीवादी (भांडवलदार) हे आम जनतेचे म्हणजे बहुजनांचे,श्रमिक कष्टकरी शेतकरी , कर्मचारी , कामगार यांचे शोषण करीत आहेत.रात्रंदिवस शेतात राब- राब राबून पिकविलेल्या मालास भाव कमी देऊन शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे शोषण केल्या जात आहे.
हे कारखानदार अशी पिळवणूक करतात आणि स्वतः गब्बर होतात,म्हणून हे पुन्जीपती एक प्रकारचे ढेकूणच होत.कंपनी आणि उद्योगपती कर्मचाऱ्यांना कमी पगार किंवा डेली वेजेस देऊन नफा कमावतात. बडे व्यापारी भरपूर नफा कमावतात,ग्राहकांची लूट करून,सरकार महागाई वाढवून, टॅक्स वाढवून जनतेची पिळवाणुक करीत असते. नाशिले पदार्थ यांची तस्करी , दारूकारखाने आणि विक्री यातून लोकांची आर्थिक शोषण सरकार करते,शिवाय लोकांना व्यसनाधीन बनउन त्यांचे संसार उध्वस्त करण्याचे काम सरकार करते,भ्रष्टाचार,काळाबाजार,साठेबाजी,अशा अनेक मार्गाने जनतेचे शोषण सरकार करीत असते.अवैध धंदे चालू ठेऊन मंत्री अलोट संपती जमा करतात.अशाप्रकारे जनतेचे रक्त शोषण करणारे हे ढेकूणच आहेत.
मनुवादी मच्छर हे जनतेचे सामाजिक शोषण करतात.मनुवादी म्हणजे सामाजिक विषमतावादी.
हे एकसंघ भारतीय समाजाचे हजारो जाती बनवून तुकडे करतात,आणि त्यांच्यात द्वेष निर्माण करून भांडणे लावतात, फोडा आणि झोडा हे या मनुवादी मच्छरांचे कार्य आहे,जशी जातीव्यवस्था निर्माण करतात,तशी धर्मव्यवस्था आणि धर्मांधता रुजविण्याचे काम हे मनुवादी मच्छर करीत असतात.दोन धर्मात भांडणे लाउन आपली राजकीय पोळी भाजून घेतात.
धर्माचे वर्तन म्हणजे कर्मकांड आणि अंधश्रद्धा ,रूढी,परंपरा, सण वार,नवस सायास या गोष्टीं भक्तांना,भोळ्या भाबड्या , आदन्यानी लोकांना करण्याचे वळण लाऊन त्यांना मानसिक गुलाम बनवितात,आणि त्यांचे आर्थिक शारीरिक मानसिक शोषण करतात,देव आणि धर्माच्या नावाने. या मनुवादी मच्छरांच्या प्रचाराला सामान्यजन बळी पडतात.
अशा प्रकारे पूंजीवादी ढेकूण आणि मनुवादी मच्छर माणसापेक्षा शक्तीने कमी असूनही माणसाचे रक्त शोषण करतात.आणि माणसाला आपले गुलाम बनवित्तात.त्यांच्या त्रासाने माणूस हतबल होतो.
हे चित्र बदलायचे झाले तर, आम् शोषित जनतेनी एकी करून जागृत राहून ,सरकार आपले आणून सरकारी मोहीम हाती घेऊन या रक्तपिपासू किड्यानवर फवारणी करण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल.
तरच आपल्या शरीरातील रक्ताचे रक्षण होईल,जिवंत राहणे शक्य होईल.
नाहीतर परत गुलामगिरीची व्यवस्था निर्माण होईल.हे स्पष्टच दिसते आहे.
लेखक :- दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 28 जुलै 2025 फोन: 9420912209.


