Home देशविदेश देशद्रोही,समाजद्रोही,नालायक,निच व नासमज लोकच जगमान्य थोर समाजसुधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीकृती पुतळ्यांची तोडफोड...

देशद्रोही,समाजद्रोही,नालायक,निच व नासमज लोकच जगमान्य थोर समाजसुधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीकृती पुतळ्यांची तोडफोड करतात..‌  — डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच या देशातील सर्व पुरुष व महिलांना उत्तम जगण्याची कायदेशीर संधी मिळाली!..

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

       भारत देशाच्या कर्मभूमीत जन्म घेणारे जगमान्य थोर समाजसुधारक तथा जगमान्य प्रकांड पंडित,भारतीय संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशातील सर्व पुरुष-महिलांचे उध्दारकर्ता आहेत याबाबत भारत देशातील ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक समाज घटकांसह ब्राह्मण,बनिया,क्षत्रियांना माहिती नसने म्हणजे त्यांची घुटण्यात अक्कल असणे होय असेच म्हणावे लागेल.(माहित असलेल्यांना सोडून.)

          भारत देशातील प्रोढ महिला-पुरुषांना मताचा अधिकार फक्त आणि फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय.या देशातील नागरिकांना मताचा अधिकार मिळावा म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९१७ पासून संघर्ष केलाय.

           डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी,”साऊथ ब्युरो कमीशन पुढे आपली न्यायसंगत व तर्कसंगत बाजू मांडताना,आताचे ओबीसी,एससी,एसटी अल्पसंख्याक नागरिकांना आणि त्या काळातील शुद्र व अतिशुद्र नागरिकांना मताचा अधिकार कसा आवश्यक आहे हे पटवून दिले होते.

         अज्ञानी व धनविहिन होते अशांना मताचा अधिकार देण्यात येवू नये असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,महात्मा गांधी,पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे म्हणणे होते.हे या देशातील बहुजन समाजातील नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. 

        भारत देशांतर्गत सार्वत्रिक निवडणुकांना अनुसरून मताचा अधिकार या देशातील मुलनिवासी बहुजन समाजातील नागरिकांना का म्हणून आवश्यक आहे आणि त्यांचा शासन-प्रशासनात सहभाग का म्हणून गरजेचा आहे हे साऊथ ब्युरो कमीशनला पटवून दिल्यानंतर सुध्दा या कमीशनचे कामकाज काही वर्ष थांबवून ठेवात ब्राह्मणवादी वर्चस्ववादी विचारसरणीच्या नेत्यांना यश आले होते.

           पण,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तर्कसंगत व कायदेशीर मांडणी पुढे ब्राह्मण वर्चस्ववादी नेत्यांचे चालले नाही.शेवटी पारतंत्र्याच्या काळात सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार या देशातील नागरिकांना मिळवून दिला होता व स्वातंत्र्याच्या काळात सुध्दा भारतीय संविधानातंर्गत मताचा अधिकार कायदेशीर दिलाय.एवढेच काय तर शासन आणि प्रशासनात कायदेशीर भागीदारी मिळवून दिली.

         महामानव युगप्रवर्तक डॉ‌.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील नागरिकांना मताचा अधिकार आणि इतर सर्व प्रकारचे आवश्यक अधिकार मिळवून दिल्यामुळेच,या देशातील सर्व नागरिकांना,देशातील सर्व निवडणुका अंतर्गत लोकप्रतिनिधी बनण्याचा अधिकार प्राप्त झालाय.

         खासदार,आमदार, नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य,प.स.सदस्य, ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक संघटनांचे नेते-पदाधिकारी-कार्यकर्ता,राजकीय पक्षांचे नेते-पदाधिकारी-कार्यकर्ते होण्याचा,संपादक-पत्रकार-वार्ताहर होण्याचा आणि शिक्षणातंर्गत शासकीय कार्यालयात,खाजगी संस्थांमध्ये आणि इतर सर्व संस्थांमध्ये अधिकारी व कर्मचारी बनण्याचा अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या चौकटी अंतर्गत कायदेशीर रित्या मिळवून दिल्यामुळेच या देशातील ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक आणि इतर नागरिकांना महत्व आहे हे समजून घेतले पाहिजे…

           अन्यथा या देशातील बहुसंख्य-बहुजन-मुलनिवासी नागरिकांना,(महिला षुरुष,युवक,युवती,बेरोजगार,विद्यार्थी,विद्यार्थींनी,शेतकरी,मजूर) कोणीही मानसन्मान दिला नसता.

       नव्हेतर यांना मानसन्मानाचे जिवन जगण्याचा दिवसच उजाळला नसता.तद्वतच मनुवादी वर्णव्यवस्था अंतर्गत गुलाम बनून रहावे लागले असते हेही तितकेच खरे आहे.

         ज्यांच्या आयुष्याचे वाटोळे मनुस्मृतीच्या कायद्यांनी केले होते.वेद,पुराण,उपनिषदे,महाभारतात व रामायनात शुद्रांचे आणि अतिशुद्रांचे अधिकार नाकारण्यात आले होते,त्यांना मनुस्मृतीच्या कायद्यांतर्गत मानसिक आणि सामाजिक गुलाम केले होते,अधिकारविहिन व धनविहिन केले होते तेच नालायक आणि बहुजन समाजातील नालायक नागरिक,हे नालायकांचेच तळवे चाटत युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीकृती पुतळ्यांची तोडफोड करतात हे या देशाचे व या देशातील नागरिकांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.

          तद्वतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीकृती पुतळ्यांची तोडफोड करणाऱ्या नालायकांना या देशाचे सत्ताधारी आणि या देशांतर्गत राज्य सत्ताधारी माथेफिरू व मनोरुग्ण समजतात यासारखे त्यांचे दुर्दैव कोणते असू शकेल?

           आणि या माथेफिरूंना आणि मनोरुग्णांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्याच प्रतीकृती पुतळ्यांची तोडफोड करण्यासाठी व विटंबना करण्यासाठी वेळ भेटतोय आणि त्यांची त्यावेळी बुध्दी चांगली असते हे कसे काय? हा गंभीर प्रश्न आहे.

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी,आणि समाजसुधारक होते.त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि दलित व इतर सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी लढा दिला हे या देशातील नागरिकांना स्वातंत्र्याचा ७५ वर्षांनंतर सुध्दा समजत नाही काय?

         येवढ्या मठ बुद्धीचे नागरिक अजूनही भारतात असतील तर त्यांच्या डोक्यात योग्य ज्ञान भरण्याची व त्यांना आवश्यक इतिहास समजावून सांगण्याची नैतिक जबाबदारी केंद्र सरकारने व भारत देशांतर्गत राज्य सरकारे यांनी पार पाडली पाहिजे..

       डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागले.शालेय शिक्षण घेत असताना त्यांना आणि इतर दलित मुलांना वेगळे बसवले जात असे.

          भेदभावातंर्गत गंभीर छळाला सामोरे जाताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली.कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. आणि पीएच.डी.(अर्थशास्त्र) पदवी मिळवली.लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून त्यांनी एम.एस्सी.आणि डी.एस्सी. (अर्थशास्त्र) पदवी मिळवली.त्यांनी कायद्याची पदवी (बॅरिस्टर) देखील मिळवली…

       त्या काळात त्यांनी ३२ प्रकारच्या डिग्री प्राप्त केल्यात.आणि आज ते जगाचे ज्ञान प्रतीक म्हणून संबोधले जातात.वास्तिव या देशातील सर्व नागरिकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत भूषण असायला पाहिजे होते.

         परंतु भारत देशात गलिच्छ व निच प्रवृत्तीचे राजकारण आणि समाजकारण काही सत्ताधाऱ्यांकडून आणि काही जातीयवादी संघटनांकडून सुरू असल्याने युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत देशातील नागरिकांना चुकीची माहिती दिली जाते आहे.

      सामाजिक आणि राजकीय कार्य करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि इतर मागासलेल्या लोकांसाठी आयुष्यभर लढा दिला.त्यांनी ‘बहिष्कृत भारत’, ‘मूकनायक’ आणि ‘जनता’ यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली,ज्यांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक सुधारणांची विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवली. 

    शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला.महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला आणि त्यांना शिक्षण आणि समान संधी मिळवण्यावर भर दिला. 

     1927 मध्ये,त्यांनी महाड येथे ‘चवदार’ तळ्याचा सत्याग्रह केला,ज्यामध्ये त्यांनी अस्पृश्यांना पाणी पिण्याचा हक्क मिळवून दिला.1930-32 दरम्यान,त्यांनी गोलमेज परिषदेत (Round Table Conferences) दलित समाजाचे प्रतिनिधित्व केले.1936 मध्ये,त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्षा’ची (Independent Labour Party) स्थापना केली. 

     1947 मध्ये,भारत स्वतंत्र झाल्यावर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांनी भारतीय संविधान निर्माण केले.त्यांनी संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क,सामाजिक न्याय,आणि समानतेसारख्या तत्वांचा समावेश केला.1950 मध्ये, भारतीय संविधान अंमलात आले. 

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार आजही प्रेरणादायी आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य खूप मोठे आणि बहुआयामी आहे.त्यांनी समाजसुधारणा,दलित आणि महिलांचे हक्क,भारतीय संविधान आणि बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. 

      १) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित (अस्पृश्य) लोकांविरुद्ध होणाऱ्या सामाजिक भेदभावाला विरोध केला आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला.अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. 

2.महिलांचे हक्क…

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला.त्यांनी महिलांना शिक्षण,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात समान संधी मिळवण्यावर जोर दिला.गर्भपातासारख्या विषयांवर त्यांनी जनजागृती केली.एखाद्या देशाच्या प्रगतीचे मोजमाप तेथील स्त्रियांच्या स्थितीवरून केले पाहिजे,असे त्यांचे मत होते.

3.भारतीय संविधान…

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.त्यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला.संविधानाने भारतीय राज्यव्यवस्थेला सक्षम आणि समर्थ बनवले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करताना भारतीय संस्कृती आणि विचारधारा यांचा विचार केला.

4. बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन…

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी कार्य केले.त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि दलित समाजाला नवीन दिशा दिली.

5. इतर कार्य…

       ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्रीसह इतर खात्याचे मंत्री होते.स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी त्यांनी कार्य केले.

        भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरा पासून सुटका मिळावी यासाठी अथक प्रयत्न बाबासाहेबांनी केले.यात इतिहास कालीन स्त्रियांची परिस्तिथीचा अभ्यास,चिंतन,विविध लेख,पुस्तके मधून लिखाण,विविध आंदोलनामधून कार्य त्यांनी केले .

     डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही भारतातील नागरी हक्क कार्यकर्ते,वकील आणि राजकारणी व बहुसंख्य मानणारा समाज,साजरी करतोय.आंबेडकर जयंती ही जगातील सर्वात मोठी जयंती मानली जाते.

      १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना तीव्र जातीभेदाचा सामना करावा लागला.परंतु त्यांनी त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीद्वारे या आव्हानांवर मात केली.सामाजिक समानता आणि न्यायाचे ते कट्टर पुरस्कर्ते होते,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती-आधारित दडपशाहीविरुद्ध लढण्यासाठी आणि उपेक्षित समुदायांच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले.ते देशातील नागरिकांचे व देशाचे चेतना आहेत.संघर्षाचे प्रेरणा आहेत.

          असे असताना या देशातील बिनडोक नागरिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करतात आणि त्यांचे प्रती कृती पुतळे फोडाफोडीचे काम करतात.