Home Maharashtra भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 कायद्याच्या अंमलबजावणी करिता…

भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 कायद्याच्या अंमलबजावणी करिता…

  अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

        दखल न्युज भारत

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय,मुंबई (गृह विभाग)यांच्या मार्फतीने अमरावती ग्रामीण पोलीस घटकास फॉरेन्सिक व्हॅन तसेच सहा तज्ञांचे पथक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 

         अमरावती ग्रामीण घटकातील विविध पोलीस स्टेशनला दाखल होणाऱ्या गंभीर गुन्ह्यात सदर पथक घटनास्थळी भेट देऊन भौतिक रासायनिक जैविक व संगणकीय पुरावे गोळा करण्याचे काम करणार आहे. सदर वाहनांमध्ये आवश्यक सर्व रसायने व साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

         सदरचे वाहन व तज्ञ हे अमरावती पोलीस घटकात कार्यरत राहणार असून 24 तास उपलब्ध राहणार आहेत. 

         यापूर्वी सदर पुरावे गोळा करण्याकरिता प्रशिक्षण घेतलेले आयका युनिट येथील पोलीस अंमलदार यांचा उपयोग करण्यात येत होता परंतु आता केमिकल एनारायझर तसेच सायंटिफिक असिस्टंट यांच्याद्वारे सदर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याने प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना सदर पुराव्यांना ठोस पाठबळ मिळून गुन्हे सिद्ध दोषी चे प्रमाण निश्चितच वाढवण्याचे प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे.