ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- तालुक्यातील अनेक गावांचा सर्वे करत आज हत्तींनी आपला मोर्चा सालमारा गावात वळविला व आवत्या आणि रोवणी जमीनजोस्त करीत जवळच चिपोरी घाटावर मुक्काम ठोकला आहे त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज पहाटेला हत्तीचा झुंड ज्यात अंदाजे ३० ते ३५ हत्ती असावे असा गावकऱ्यांचे मनने आहे.
काल वैरागड नजीकच्या सालमारा रोड वर हत्तींनी संडास केली होती व रात्रीला सालमारा तलावचे बाजूने आक्रमक मोर्चा वळविला त्यात आवत्या व रोवणी चे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करीत पायदळी तुडवीत पऱ्या वरही ताव मारला.
वनपरिक्षेत्र सहा.बोरकर यांचेशी मोबाईल वर संपर्क केला असता त्यांनी असे म्हटले की तुमची नुकसान झाली असेल तर अगोदर ऑनलाईन अर्ज करा व ते आमच्या ऑफिसला आणून द्या त्यानंतर पंचनामा करू.



