Home देशविदेश आज आम्ही ( भारतीय जनता ) व्यवस्थेचे गुलाम!,”करतो राजकारण्यांना सलाम… लेखाचा...

आज आम्ही ( भारतीय जनता ) व्यवस्थेचे गुलाम!,”करतो राजकारण्यांना सलाम… लेखाचा :- पुर्वार्ध….

  “गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या. म्हणजे ते बंड करून उठल्याशिवाय राहणार नाहीत.- डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

       या एकाच शेवटच्या आदेशामुळे संपूर्ण देशात व्यवस्थेच्या विरोधात आंदोलने, मोर्चे, उपोषण, जनजागरण परिषदा. विद्रोह इ. चळवळी चालू झाल्या…

         आपल्या देशाला परकीय आक्रमणकर्त्यांच्या गुलामीचा सुमारे 4000 वर्षांचा इतिहास आहे. या देशात सिंधू संस्कृतीच्या काळात प्रथम आक्रमणकर्ते आले,ते म्हणजे आर्य ( आत्ताचे ब्राम्हण्यवृत्तीचे ब्राम्हण) आणि शेवटचे आक्रमणकर्ते लोकशाहीवादी, सुधारणावादी विचारसरणीचे परंतू ,साम्राज्यवादी विचारसरणीचे इंग्रज.

        या दोन्ही आक्रमणकर्त्यांच्या दरम्यानच्या 4000 वर्षांच्या काळात विविध ग्रीक, कुशान, अरबी,डच,पोर्तुगीज इ. आक्रमणकर्ते येऊन राज्यकर्ते बनून,स्वाऱ्या करून अनेक वर्षानुवर्षे राज्य केले आणि गेले.

        या सर्व प्रकारच्या गुलामीच्या इतिहासात मात्र दोन प्रकारची गुलामी होती.एक कुसांस्कृतिक वैचारिक गुलामी आणि दुसरी देशावर राज्य करून देशाला लुटून कंगाल करणारी.

        परंतू , या संपूर्ण 4000 वर्षाच्या इतिहासात मात्र एका गुलामीला आजही आम्ही देशातून कायमचे घालवू शकलो नाही.

     जी गुलामी आम्हांला आजही सदविचारी माणूस बनू देण्यापासून थांबवते!…

        ती म्हणजे निसर्गवादाविरोधात असलेली. मानवताविरोधी असलेली मनुस्मृतीवर आधारित असलेली साम,दाम,दंड आणि भेदावर आधारलेली.कुटनीती,जीचा जन्म बाहेरून आलेल्या आर्यानी केला.

       अशा ऐतिहासिक कुसांस्कृतिक गुलामीच्या देशाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करण्यासाठी प्रथम प्रयत्न केला तो….

  “तथागत भगवान बुद्धांनी…. 

      त्यानंतर शेवटच्या काळात म्हणजे एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात फुले,शाहू ,आंबेडकर यांनी.मधल्या काळात अनेकांनी अर्थात सम्राट अशोक,सम्राट कनिष्क सम्राट हर्षवर्धन त्यांच्यानंतर संत ज्ञानेश्वर,संत कबीर,म.बसवेश्वर,संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज,संत तुकाराम,वारकरी संप्रदाय,इत्यादी समाज सुधारकांनी या कुसंस्कृतीला देशातून कायमचे घालविण्यासाठी प्रयत्न केल्या गेले.

        परंतु ,या सर्वांच्या प्रयत्नात यश आले ते म्हणजे म. फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची पायाभरणी केल्याने सुरुवात होऊन,राजर्षी शाहू महाराजांनी या शिक्षणाला आरक्षणातून राजाश्रय देऊन याच्या कळसाची तयारी केली. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम मनुस्मृती दहन आणि महाडचा सत्यागृह,नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह करून शेवटी….

    “भारताचे संविधान,देशाला प्रदान करून कळस चढवीला.शेवटी देशाला बुद्ध धम्म देऊन त्या कळसाला ‘ प्लॅटिनमचा ‘ मुलामा चढवला.!

       सर्वच महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्य प्रदान करुन,ते स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व कायम टिकविण्यासाठी हजारो वर्षाच्या दूरदृष्टीचा विचार करून भारताच्या संविधानाची निर्मिती करून देशाच्या गुलामीचा कायमचा इतिहास मिटवून देशाचा पुनर्जन्म केला. आणि ते स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व संविधानाच्या मदतीने टिकविण्याची घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी आमच्यावर ( भारतीय जनतेवर ) सोडून महापुरुषांनी जगाचा निरोप घेतला.

         या जबाबदारीच्या आणि कर्तव्याच्या कसोटीवर आम्ही गेल्या 75 वर्षात किती खरे उतरलो? हा प्रश्न आम्ही प्रत्येकानी स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीला विचारावा ( जागृत असेल तर ).!

     या प्रश्नाचे सामूहिक उत्तर शोधायचे आणि त्याचे विश्लेषण करायचे असेल तर आपल्याला गेल्या 75 वर्षाच्या इतिहासाचा मागोवा घ्यावा लागेल…. 

 (मागोवा (लेखाचा उत्तरार्ध):- उद्याच्या भागात.)

      जागृतीचा कृतिशील लेखक 

      अनंत केरबाजी भवरे 

 संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689…