शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
नुकत्याच जाहीर झालेल्या 5वी च्या शिष्यवृत्ती परिक्षेत पुसद येथील जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी सार्थक दिपक भवरे ह्याने विशेष प्राविण्यासह राज्यातून 12 वा मेरिट संपादन केला.
विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कसोटी पारखणारी स्कॉलरशिप परिक्षा महाराष्ट राज्य परिक्षा परिषद, पुणे तर्फे 5वी आणि 8वी तील विद्यार्थ्यांकरीता आयोजीत केली जाते.
यापूर्वी देखील नामांकित राष्ट्रीय मिलिटरी स्कूल,ऑल इंडिया सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय अशा विविध परीक्षेत सार्थकने उत्तुंग कामगिरी बजावली आहे.
आता शिष्यवृत्ती परिक्षेत संपादन केलेल्या त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्याच्या यशात जेट किड्स स्कूलचे संचालक,शिक्षक,अश्विनी वाडीकर मॅडम-सर,कौस्तुभ धुमाळे सर ज्ञानदीप अकादमी,आई-बाबा यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.



